smriti mandhana sakal
क्रीडा

स्मृती मानधनाने T20I क्रिकेटमध्ये रचला इतिहास, रोहित -विराटच्या क्लबमध्ये सामील

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिच्यासाठी आजचा दिवस खूपच खास आहे.

Kiran Mahanavar

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिच्यासाठी आजचा दिवस खूपच खास आहे. स्मृती मंधानाने एका खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे, ज्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, माजी महिला कर्णधार मिताली राज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांचा समावेश आहे. स्मृती मंधानाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. (Smriti Mandhana Records)

स्मृती मानधनापूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली, मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित आणि विराटने 3 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत, तर मिताली राज आणि हरमनप्रीत कौर या महिला क्रिकेटपटूंमध्ये एकमेव फलंदाज आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 2000 हून अधिक धावा पूर्ण केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात स्मृती मंधानाने 11 धावा करताच तिच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. या सामन्यात ती केवळ 22 धावाच करू शकली असली तरी एक मोठी कामगिरी तिने आपल्या नावावर केली. स्मृती मानधनाने 86 सामन्यात 14 अर्धशतकांसह 2000 धावा पूर्ण केल्या आहेत.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा

  • रोहित शर्मा - 3313 धावा

  • विराट कोहली - 3296 धावा

  • हरमनप्रीत कौर - 2372 धावा

  • मिताली राज - 2364 धावा

  • स्मृ ती मानधना - 2011 धावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यानां जमलं नाही ते सामन्यात करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

Nashik Dharmantar Case: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलिसांना निर्देश!

Pune Drunk and Drive News : पुण्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर कडक कारवाई; २२९ मद्यपी चालकांचे समुपदेशन, वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT