Smriti Mandhana Instagram
क्रीडा

स्मृतीनं एका ओळीत सांगितली आयुष्याच्या प्रवासाची कहाणी

तिच्या फोटोवर कमेंटची बरसात होताना पाहायला मिळतेय.

सुशांत जाधव

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. कसोटी आणि वनडे मालिकेनंतर महिला क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. शुक्रवारी 9 जुलै पासून भारत-इंग्लंड महिला क्रिकेट संघातील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या टी-20 मालिकेपूर्वी भारतीय महिला संघाची सलामीची फलंदाज सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत असलेल्या स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो शेअर केला. हा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. तिच्या फोटोवर कमेंटची बरसात होताना पाहायला मिळतेय. (Smriti Mandhana Shares Photo Goes Viral On Internet)

स्मृती मानधनाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन बसमधून प्रवास करतानाचा एक फोटो शेअर केलाय. चढ-उतारातून आयुष्याचा प्रवास सुरु आहे, असे खास कॅप्शन तिने या फोटोला दिल्याचे दिसते. स्मृती मानधनाचा हा फोटो सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसतोय. काही नेटकरी तिला क्यूटी-ब्यूटी असे म्हणत आहेत.

एकमेव कसोटी सामना भारतीय महिला संघाने अनिर्णित राखला होता. त्यानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय महिला संघाला 2-1 असा पराभव स्विकारावा लागला. अखेरच्या वनडे सामन्यात स्मृती मानधनाने 49 धावांची खेळी करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. याशिवाय कमालीच्या फिल्डिंगने तिने सर्वांचे लक्ष वेधले होते. स्मृती मानधनाचा चाहता वर्ग अफाट असाच आहे. कसोटी मालिकेदरम्यानही तिचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते.

भारतीय महिला संघ इंग्लंड विरुद्ध 9 जुलैला पहिला टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 11 जुलैला दुसरा तर 15 जुलैच्या सामन्याने या मालिकेती सांगता होईल. मिताली राजच्या नेतृत्वाखाली वनडे मालिका गमावल्यानंतर भारतीय महिला टी-20 मालिकेत धमाकेदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतील. हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike : दूध महागणार! १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ; नवा दर किती?

Devdutta Padikkal Tattoo: बाबो! जर्सीचा नंबर अन् नाव थेट पाठीवर! पडिक्कलच्या टॅटू पाहून चाहतेही चक्रावले, म्हणाले, ‘ अरे हे काय!’

Animal Feed Poisoning: पशुखाद्यातून विषबाधा; गोणेवाडीत दोन जनावरे दगावली, दोन गंभीर; पशुपालकाला मोठा आर्थिक फटका

Marathi News Live Updates : RSS पथसंचलनात सहभागी झाल्याने दोन शिक्षक निलंबित; एच. डी. कुमारस्वामींचा सरकारला सवाल

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात माणुसकीला लाज आणणारी घटना! मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने चोरले; VIDEO VIRAL होताच संतापाची लाट

SCROLL FOR NEXT