Snake In Mitchell Johnson Hotel Room ESAKAL
क्रीडा

LLC : जॉन्सनच्या लखनौमधील हॉटेल रूममध्ये सापडला साप, म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

Snake In Mitchell Johnson Hotel Room : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन सध्या लेजंड लीग क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी भारतात आला आहे. सध्या लखनौमध्ये असलेल्या जॉनसनला एक धक्कादायक अनुभव आला. त्याच्या हॉटेलमध्ये साप सापडला. याबाबतचे फोटो जॉन्सनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. यावेळी चाहत्यांनी त्याला हा कोणत्या प्रजातीचा साप आहे हे देखील शोधून काढण्यास मदत केली.

जॉन्सन आपल्या इन्स्टाग्रमवर या सापाचे फोटो शेअर करत म्हणला की, 'कोणाला माहिती आहे का हा कोणत्या प्रकारचा साप आहे? हा माझ्या हॉटेल रूमच्या बाहेर फिरत होता.' जॉन्सनच्या या पोस्टवर ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज वेन फिलेंडर यांनी प्रतिक्रिया दिली.

जॉन्सनने सापाचा अजून एक फोटो शेअर करत लिहिले की सापाचा अजून एक चांगला फोटो मिळाला, हा कोणता साप आहे हे अजून समजले नाही. लखनौ, भारतातील आतापर्यंतचा सर्वात चांगला स्टे!' जॉन्सनने लेजंड लीग क्रिकेट स्पर्धेत भारताला मोठा धक्का दिला होता. त्याने विरेंद्र सेहवागला बाद केले होते. त्याने 3 षटकात फक्त 22 धावा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्ज फेडण्याआधीच झाला मृत्यू, महिलेने वसुलीपोटी मृतदेहासोबत केलं घृणास्पद कृत्य

Jawed Habib FIR News : सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब विरुद्ध तब्बल ३२ 'FIR' दाखल!

ICC च्या 'या' पुरस्कारांवर भारतीयाचंच वर्चस्व! अभिषेक शर्मा अन् स्मृती मनाधना ठरले सर्वोत्तम

Prakash Londeh :'भूयार' सापडलेल्या परिसरात महापालिकेची कारवाई; लोंढे कुटुंबाच्या अडचणीत वाढ

फ्रेश लुक असलेला "लास्ट स्टॉप खांदा चित्रपटाचा टीजर लाँच; 'या' दिवशी येणार भेटीला

SCROLL FOR NEXT