sofiane boufal celebration with his mother video goes viral after morocco defeated Portugal FIFA WC 2022  
क्रीडा

FIFA WC 2022 : मोरोक्कोच्या खेळाडूनं आईसोबत साजरा केला विजयाचा आनंद; Viral Video ने जिंकली मनं

सकाळ डिजिटल टीम

FIFA WC 2022 : फिफा विश्वचषक 2022 मध्ये, मोरोक्कोने पोर्तुगालविरुद्ध दणदणीत विजय मिळवून इतिहास रचला. मोरोक्कोने पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. मोरोक्कनच्या खेळाडूंसाठी हा विजय खूप मोठा होता. त्यामुळेच सामना संपल्यानंतर त्यांनी हा विजय मोठ्या जल्लोषात साजरा केला.

दरम्यान मोरोक्कोसाठी अटॅकिंग मिडफिल्डर म्हणून खेळणारा सोफीयन बूफलने हा विजय तिच्या आईसोबत साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत सामना जिंकल्याच्या आनंदात सामना संपल्यानंतर बूफलआणि त्याची आई मैदानावर नाचताना दिसत आहेत. बूफल आणि त्याची आई एकत्र नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काही तासांतच तो लाखो लोकांनी पाहिला आहे. लोक हा व्हिडिओ आणि फोटो पाहून भावनिक कमेंट करत आहेत.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

मोरोक्कोने इतिहास रचला

मोरोक्कोने पोर्तुगालला पराभूत करून इतिहास रचला असून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे. या सामन्याच्या पूर्वार्धात कोणत्याही संघाला गोल करता आला नाही, मात्र उत्तरार्धात मोरोक्कोने गोल करत सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

मोरोक्कोने संपूर्ण स्पर्धेत डिप डिफेंस खेळ खेळला आगे आणि या सामन्यातही त्यांची डिफेंसची ताकद दिसून आली. या पराभवामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना फ्रान्सशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT