Sourav Ganguly Birthday Special esakal
क्रीडा

Sourav Ganguly Birthday : सौरव गांगुलीने वडिलांचा 'तो' सल्ला ऐकला नाही अन् पुढे इतिहास घडला...

Sourav Ganguly: सौरव गांगुलीचा आज वाढदिवस असून त्याच्याबद्दलचा एक किस्सा जाणून घ्या.

अनिरुद्ध संकपाळ

Sourav Ganguly Birthday : भारतीय क्रिकेट इतिहासात सर्वात झुंजार कर्णधार कोण असा प्रश्न विचारला तर अनेक चाहते हे सौरव गांगुलीचे नाव घेतील. ज्यावेळी भारतीय क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या गर्तेत अडकलं होतं. संघावरील चाहत्यांचा विश्वास उडाला होता त्यावेळी सौरव गांगुलीने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्याने त्याकाळच्या बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाशी डोळ्यात डोळे घालून भिडेल अन् पराभवाची धूळ देखील चारले असा संघ तयार केला. आज या भारताच्या सर्वात आवडत्या कर्णधाराचा वाढदिवस आहे.

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मायदेशातच नाही तर परदेशात देखील दमदार कामगिरी करू लागलासध्या जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं जे स्थान आहे त्याची पायाभरणी ही दादानेच केली होती. मात्र दादाला देखील आपल्या कारकिर्दीत एक मोठा धक्का सहन करावा लागला होता. त्यानं कर्णधारपद नाही तर संघातील स्थान देखील गमावलं होतं. त्या कठिण काळाबद्दल सौरव गांगुली एका कार्यक्रमात बोलला होता.

सौरव गांगुली म्हणाला होता की त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं की भारतीय संघात कमबॅक करण्याची काही गरज नाही.

या आठवणींना उजाळा देताना गांगुली म्हणाला, 'ज्यावेळी मी भारतीय संघातून वगळलो गेलो त्यावेळी मी एका रविवारी असाच घरी बसलो होते. त्यावेळी वडील माझ्याजवळ आले आणि म्हणाले तू खूप क्रिकेट खेळला आहेस. तू भारताकडून जवळपास 350 सामने खेळला आहेस. तुला अजून एक सामना खेळण्याची संधी मिळाली नाही तरी काही फरक पडणार नाही. तू जे काही साध्य केलं आहेत ते भारतीय क्रिकेट इतिहासात नोंदवलं गेलं आहे.'

सौरव गांगुली पुढे म्हणाला की, 'मी वडिलांच्या या सल्ल्यावर काही बोललो नाही. माझ्या तोंडून एकही शब्द निघाला नाही. कारण त्यांना माहिती होतं की मी कोणत्या परिस्थितीतून जात होतो. तुम्ही चांगलं खेळूनही संघात निवडले जात नसाल तो तुमच्या आयुष्यातील एक नाजूक भाग असतो. हा विषय त्याच दिवशी संपला.'

'मात्र माझे वडील चार दिवसांनी परत माझ्याजवळ आले आणि म्हणाले की तू काय ठरवलं आहेस. माझी भारतीय संघात पुनरागमन करण्याची आशा दिवसेंदिवस मावळत होती. मात्र मी एका दिवशी ठरवलं अन् वडिलांना सांगितलं की मी 33 - 34 वर्षाचा झालो आहे. मला अजून खेळायचं आहे. एकदा का वय झालं की तुम्हाला खेळणं कठिण होतं. माझ्याकडे अजून तीन चार वर्षे होती.'

'मला भारतीय संघात परतण्याचा प्रयत्न करायचा होता. मी पुन्हा संघात स्थान मिळवेन की नाही मला माहिती नव्हतं. पण मला 40 व्या वर्षी बसून ज्यावेळी लोकांनी तुला संघातून बाहेर जाण्यास सांगितलं त्यानंतर तू पुनरागमन करण्याचा प्रयत्नच केला नाहीस असं स्वतःशीच बोलू इच्छित नव्हतो.'

'मी भारतीय संघात कमबॅक केलं त्यावेळी माझा लाडका मित्र सचिन तेंडुलकर माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, सौरव माझ्या मते तुझ्या कारकिर्दीतील शेवटची तीन चार वर्षे सर्वात चांगली होती. मी तुला याच वर्षात सर्वोत्तम क्रिकेट खेळताना पाहिलं.'

'मलाही याची जाणीव झाली की ती 3 ते 4 वर्षे ही माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली वर्षे होती. कारण त्या काळातच जर मी धावा केल्या तरच पुढचा सामना खेळू शकत होतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict Pune: ''आता फासावर चढा.. वय नव्हे, क्रूरता महत्त्वाची'' निकालपत्र वाचून दाखवताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Venezuela Earthquake: नेमारची फुटबॉल मैदानापलीकडची माणुसकी! भूकंपाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या देशाला मदतीचा हात; किती दिली देणगी?

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Latest Marathi News Live Update : जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे... कुडाळमध्ये 17 वर्षांपासून पुरुषांकडून अनोखी वटपौर्णिमा

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! 2 प्रसिद्ध अभिनेत्रीचाही सहभाग; गिरगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT