Sourav Ganguly KL Rahul Bad Patch  esakal
क्रीडा

Sourav Ganguly KL Rahul : जर भारतातच धावा केल्या नाहीत तर... गांगुलीने केएल राहुलला दिल्या कानपिचक्या

अनिरुद्ध संकपाळ

Sourav Ganguly KL Rahul Bad Patch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदौरच्या होळकर स्टेडियमवर होत आहे. या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण त्याला गेल्या दोन कसोटी सामन्यात फारशी चमक दाखवता आलेली नाही. यावरून त्याच्यावर आता माजी क्रिकेटपटू सडकून टीका करत आहेत. याबाबत आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपले मत व्यक्त केले.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत केएल राहुलवर खराब फॉर्ममुळे होत असलेल्या टीकेबद्दल सौरव गांगुली म्हणाला, 'ज्यावेळी तुम्ही भारतात धावा करू शकत नसाल त्यावेळी टीका होणारच. केएल राहुलच नाही तर अनेक खेळाडूंवर अशी टीका झाली आहे. हा अशीच पद्धत आहे. आता कसोटीवर खूप फोकस आहे. खेळाडूंवर जास्तच लक्ष आहे.'

गांगुली पुढे म्हणाला की, 'संघ व्यवस्थापन केएल राहुलला महत्वाचा खेळाडू मानत आहे. शेवटी कॅप्टन आणि कोच काय विचार करतात हे सर्वात महत्वाचे आहे. केएल राहुलने यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे. भारताकडून खेळताना वरच्या फळीतील फलंदाजाकडून जास्त अपेक्षा असते.'

सौरव गांगुलीने सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला देखील डिवचले. गांगुली म्हणाला की, 'आपण कायम आधीच्या ऑस्ट्रेलिया संघाची तुलना आताच्या ऑस्ट्रेलियन संघाशी करतोय. मात्र हा तो संघ नाही. त्यांच्याकडे हेडन, लँगर, स्टीव वॉ, मार्क वॉ, गिलख्रिस्ट, पॉटिंग असे गुणवत्तापूर्ण खेळाडू नाहीत.'

बीसीसीआयचा माजी अध्यक्ष गांगुली पुढे म्हणाला की, 'आताच्या संघातला स्टीव्ह स्मिथ एक चांगला खेळाडू आहे. डेव्हिड वॉर्नरला या मालिकेत फारशी चमक दाखवता आली नाही. मार्नस लाबुशेनकडेही गुणवत्ता आहे. मात्र भारतातील खडतर परिस्थितीत खेळायचं आहे. आपण कायम ऑस्ट्रेलिया म्हणजे स्टीव वॉची ऑस्ट्रेलिया असं समजतो. मात्र अशी परिस्थिती नाही. वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीने तपासले जातात.'

(Sports Latest News)

हेही वाचा : डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT