Sourav Ganguly  sakal
क्रीडा

राजीनामा नाही तर 'या' नवीन गोष्टीसाठी केलं होत गांगुलीने ते ट्विट

क्लासप्लस अ‍ॅप लाँच करत सौरव गांगुलीने राजीनाम्याच्या चर्चेला दिला पुर्णविराम

Kiran Mahanavar

Sourav Ganguly: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने काल आपल्या एका पोस्टद्वारे क्रिकेट विश्व हादरून टाकले होते. गांगुलीने एक पोस्ट केली होती. त्यामध्ये लिहिल होत, मी आता एक नवीन प्रवास सुरू करत आहे. त्यावर त्याने कोणता दुसरा खुलासा केला नव्हता. पण गांगुलीच्या या पोस्टनंतर तो बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे. लोक असे तर्कवितर्क लावू लागले. पण काही वेळातच क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले. सौरव गांगुली कोणत्या पदाचा राजीनामा देत नाहीये. दादा पूर्वीप्रमाणेच आपल्या पदावर राहणार आहे.(Sourav Ganguly ClassPlus app launch)

दादाच्या पोस्टमुळे क्रिकेट विश्व हादरून गेलं होत. दादांनी आता आणखी एका पोस्ट केले आहे. सौरव गांगुली यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एक शैक्षणिक अ‍ॅप 'ClassPlus' लाँच केला आहे. यासोबत हा अ‍ॅप शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांसाठीही खूप फायदेशीर असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

सौरभ गांगुलीने आपल्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो की, '2022 मध्ये मला क्रिकेट जगतात 30 वर्षे पूर्ण होत आहेत. मी माझा क्रिकेटचा प्रवास 1992 मध्ये सुरू केला होता. क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या सर्वांचा पाठिंबा मला मिळाला. माझ्या या प्रवासात माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे, मला समर्थन देणाऱ्या आणि मला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. तुमच्यामुळेच मी इथं पर्यंत पोहचलो आहे. आज मी काहीतरी नवीन करण्याची योजना आखत आहे. याचा फायदा लोकांना होईल. माझ्या या प्रवासात तुमचा पाठिंबा मला मिळेल अशी आशा आहे.'

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय अध्यक्ष म्हणाले, 'मी बीसीसीआयच्या पदाचा राजीनामा दिलेला नाही आणि दुसरे देखील काही कारण नाही. मी जगभरात एक नवीन शैश्रणिक अॅप लाँच करत आहे. याशिवाय दुसरे काही नाही. त्यांच्या आधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी देखील गांगुलीने आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नसल्याचे स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT