Sourav Ganguly Likely To Lift BCCI Top Post  esakal
क्रीडा

Sourav Ganguly : गांगुली अध्यक्षपद सोडणार; वर्ल्डकप विजेत्या संघातील माजी खेळाडू रेसमध्ये

अनिरुद्ध संकपाळ

Sourav Ganguly BCCI President : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने 2019 मध्ये अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र आता ते पद सोडणार आहे अशी माहिती मिळत आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत राज्य संघटनांच्या प्रतिनिधिंची यादी आली आहे. यामध्ये काही आश्चर्यकारक नावांचा समावेश आहे. या यादीतील काही व्यक्ती या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यात भारताचे माजी खेळाडू रॉजर बिन्नी यांचादेखील समावेश आहे.

बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीच्या राज्य संघ प्रतिनिधिंच्या यादीत भारताच्या 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी यांच देखील नाव आहे. यापूर्वी बीसीसीआयच्या एजीएममध्ये कर्नाटक राज्याकडून सचिव संतोष मेनन सहभागी होत होते. मात्र यंदाच्या बैठकीत त्यांच्याऐवजी रॉजर बिन्नी यांचे नाव सामील करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिन्नी यांचे नाव यादीत आलं आहे कारण त्यांना बीसीसीआयमध्ये मोठं पद मिळणार आहे. त्यांनी भारतीय संघाच्या निवडसमिती प्रमुख देखील सांभाळले होते.

बिन्नी बनू शकतात बीसीसीआयचे अध्यक्ष

रॉजर बिनी हे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. या यादीत अभिषेक डालमिया यांचे देखील नाव नाहीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयमध्ये पदासाठी त्यांची देखील दावेदारी होती. बंगाल क्रिकेट संघाकडून सौरभ गांगुली याचे प्रतिनिधी म्हणून नाव आहे. त्यामुळे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा मुलगा बीसीसीआय अध्यक्ष होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

जय शहा सचिव

गुजरात क्रिकेट असोसिएशनकडून अध्यक्ष जय शहा बीसीसीआयमध्ये सचिव पदीच कार्यरत राहण्याची शक्यता आहे. तर हिमाचलप्रदेशचे अरूण सिंह धुमल हे खजीनदार पदासाठी दावेदारी सादर करतील. देशाचे माजी अर्थमंत्री दिवंगत अरूण जेटलींचा मुलगा रोहन जेटलींना आयपीएलमध्ये मोठे पद मिळण्याची शक्यात आहे. याचबरोबर राजीव शुक्ला आणि अनिरूद्ध चौधरी देखील बीसीसीआयमधील पदाच्या शर्यतीत असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Tunnel Car Fire : मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला आग; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी!

Supriya Sule : अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीत काय घडलं ? सुप्रिया सुळेंनी Delimitation च्या भूमिकेबद्दल दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Update : सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला कोल्हापुरातून पाठिंबा

Mira Road Fire: मीरा रोड येथील दालमिया शाळेत भीषण आग! ग्रंथालय, प्रयोगशाळा, सभागृह जळून खाक; परिसरात धुराचे लोट, VIDEO VIRAL

PF News: EPF धारकांसाठी 9 मोठे बदल! PF व्याज ते 5 लाखांपर्यंत ऑटो क्लेम नेमकं काय-काय बदललं? मंत्र्यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT