Sourav Ganguly esakal
क्रीडा

Sourav Ganguly : अश्विन - जडेजाला सोडा; दादा म्हणाला, वर्ल्डकपसाठी 'या' फिरकीपटूवर असणार डोळा

अनिरुद्ध संकपाळ

Sourav Ganguly : भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकपची चर्चा आता जोर धरू लागली आहे. यंदाचा वर्ल्डकप हा भारतात होत असल्याने नक्कीच भारतीय संघ हॉट फेव्हरेट असणार आहे. त्यामुळे भारताच्या वर्ल्डकप संघाचे कॉम्बिनेशन काय असले याची चर्चा सुरू झाली आहे.

भारतातील वर्ल्डकपमध्ये फिरकीला पोषक खेळपट्ट्या मिळणार ही गोष्ट स्पष्टच आहे. त्यामुळे संघात कोणत्या कोणत्या फिरकीपटूंचा समावेश करावा याबाबत अनेक माजी क्रिकेटपटू आणि जाणकार आपली मतं व्यक्त करत आहेत. याबाबत आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने देखील वक्तव्य केलं आहे.

सौरव गांगुलीने भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या अनुभवी फिरकी जोडीला जास्त महत्व न देता रिस्ट स्पिनरवर विश्वास दाखवला आहे. त्याने बीसीसीआयला युझवेंद्र चहलवर विशेष लक्ष ठेवण्याची विनंती केली आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, 'रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव हे आहेतच मात्र युझवेंद्र चहल काही मोठ्या स्पर्धांना मुकला आहे. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मग ते टी 20 असो का वनडे! मला असं वाटतं की त्याच्यावर बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे.'

गांगुली रिस्ट स्पिनरचे महत्व स्पष्ट करताना म्हणाला की, 'ज्यावेळी तुम्ही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळता त्यावेळी भारतात रिस्ट स्पिनरमुळे खूप मोठा फरक पडतो. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये पियुष चावला होता. त्याने देखील चांगली गोलंदाजी केली होती.'

गांगुली पुढे म्हणाला की, 'ज्यावेळी आम्ही 2007 ला दक्षिण आफ्रिकेत गेलो होते. त्यावेळी देखील वेगवान गोलंदाजांबरोबर देखील रिस्ट स्पिनरने चांगली गोलंदाजी केली होती. हरभजनही त्यावेळी संघात होता. मला असे वाटते की भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये रिस्ट स्पिनर हा महत्वाचा फॅक्टर आहे.

भारताची वर्ल्डकप मोहीम ही 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ते आपला पहिला सामना हा ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळतील. त्यानंतर 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Controversy : अल्पवयीन आरोपीची गाडीला बांधून धिंड काढणे महागात, वादग्रस्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

Chiplun ACB Action : जमिनीच्या फेरफारला मंजुरी देणं भोवलं! 5 हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी जाळ्यात; कार्यालयातच ACB नं रचला सापळा

'जो करण अर्जुन में हुआ था…' सलमान खानच्या एका डायलॉगने BIGG BOSS 20 बद्दल वाढली उत्सुकता

Marathi News Live Updates : राऊतांनी पोस्ट केला शिंदेंचा फोटो, कायद्यानं खेळ आटोपतोय; राजकीय भूकंपाचे संकेत?

Khelo India Funding: खेलो इंडिया योजनेत राज्यांना प्राधान्य; केंद्र सरकारकडून क्रीडा पायाभूत सुविधांसाठी ५६५ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT