Rohit Sharma Captaincy esakal
क्रीडा

Sourav Ganguly : होकार देतोस की... कॅप्टन रोहितवर सौरव गांगुलीने केली दादागिरी, त्यावेळी नेमकं काय घडलं?

अनिरुद्ध संकपाळ

Sourav Ganguly Rohit Sharma Captaincy : भारतीय संघ यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये लीग स्टेजमध्ये तरी धमाकेदार कामगिरी करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने लीग स्टेजमधील आपले 8 सामने जिंकले आहेत. पुढचा नेदरलँडविरूद्धचा सामना देखील भारत खिशात टाकले.

भारताच्या या कामगिरीनंतर रोहितच्या नेतृत्व गुणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यादरम्यानच भारताचा माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआ अध्यक्ष सौरव गांगुलीने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्याने रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी उत्सुक नव्हता. तो खूप आढेवेढे घेत होता असा दावा सौरव गांगुलीने केला.

सौरव गांगुली कोलकात्यातील एका टीव्ही चॅनलवर मुलाखतीत म्हणाला की, 'रोहित कर्णधारपद घेण्यास उत्सुक नव्हता. त्याला 100 वेळा तायर केलं तरी तो स्पष्टपणे होकार देत नव्हता. स्थिती अशी निर्माण झाली की मी त्याला म्हटलं की तू होकार दे नाही तर मी तुझं नाव जाहीर करून टाकणार. मी असं म्हणालो कारण तो उत्कृष्ठ कर्णधार आहे. त्याने कॅप्टन्सी घेतल्याचा फायदा तुम्ही पाहत आहातच.'

रोहित शर्मा का देत होता कॅप्टन्सीला नकार?

सौरव गांगुलीला रोहित शर्मा कॅप्टन्सीला का नकार देत होता असा प्रश्न देखील विचारण्यात आला. त्यावेळी त्याने, अनेक क्रिकेटिंग कारणं होती. कसोटी क्रिकेट, वनडे क्रिकेट, टी 20 क्रिकेट... त्याचा दबाव. आयपीएल संघाचा देखील तो कर्णधार आहे. त्याच्यावर खूप जबाबदारी होती. मात्र भारताचे नेतृत्व करण्यासाराखी दुसरी गोष्ट नाही. मी आनंदी आहे की त्याने ही जबाबदारी स्विकारली.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : कोट्यवधींचा निधी गेला कुठे? पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

Monsoon Update: कोकण व्यापला; विदर्भातही प्रवेश, अनुकूल हवामानामुळे मॉन्सूनची प्रगती

SCROLL FOR NEXT