south africa creates highest successful t20-run-chase-in-t20-cricket-west indies-vs-sa-match-quinton-de-kock-johnson-charles  
क्रीडा

SA vs WI: 517 धावा, 2 शतके... T20 सामन्यात चौकार-षटकारांचा जोरदार पाऊस! दक्षिण आफ्रिकेने केला विश्वविक्रम

सकाळ ऑनलाईन टीम

South Africa vs West Indies : दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना सहा गडी राखून जिंकला. वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 259 धावांचे लक्ष्य दिले होते, जे यजमान संघाने सात चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य सहज गाठले. आंतरराष्ट्रीय टी-20 च्या इतिहासातील हा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग होता.

सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने 20 षटकात 5 विकेट गमावून 258 धावा केल्या. जॉन्सन चार्ल्सने केवळ 46 चेंडूत 11 षटकार आणि 10 चौकारांसह 118 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. यादरम्यान चार्ल्सने अवघ्या 39 चेंडूत शतक झळकावले, जे आंतरराष्ट्रीय टी-20 मधील वेस्ट इंडिजच्या खेळाडूचे सर्वात जलद शतक होते.

जॉन्सन चार्ल्सशिवाय काइल मेयर्सने 27 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 51 धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ यांनी अनुक्रमे 28, 19 आणि नाबाद 11 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक तीन आणि वेन पारनेलने दोन बळी घेतले. सिसांडा मगालाने चार षटकांत 67 धावा दिल्या आणि तो त्याच्या संघाचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला.

मोठ्या धावसंख्येसमोर आफ्रिकेचे फलंदाज खचले नाहीत. क्विंटन डिकॉक आणि रीझा हेंड्रिक्स यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे पॉवरप्लेमध्येच दक्षिण आफ्रिकेने 102 धावा केल्या. यादरम्यान क्विंटन डिकॉकने 15 चेंडूत अर्धशतक झळकावले. दोन्ही फलंदाजांनी कॅरेबियन गोलंदाजांची मारा सुरूच ठेवला. डिकॉकने 43 चेंडूत 9 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. मात्र शतक झळकावल्यानंतर लगेचच तो बाद झाला. डिकॉक (100 धावा) बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 10.5 षटकांत एका विकेटवर 152 अशी होती.

डिकॉक बाद झाल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा दबदबा कायम राहिला. रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (38*), हेनरिक क्लासेन (16*), रिलो रोसो (16) यांनी महत्त्वाचे योगदान देत संघाला विजय मिळवून दिला. रीझा हेंड्रिक्सने 28 चेंडूत 68 धावांची खेळी केली. कर्णधार एडन मार्करामने 21 चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार लगावला.

या सामन्यात एकूण 517 धावा झाल्या ज्या कोणत्याही टी-20 सामन्यातील सर्वाधिक आहेत. यापूर्वी पाकिस्तान सुपर लीग 2023 मध्ये मुलतान सुलतान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील सामन्यात 515 धावा झाल्या होत्या. मुलतान सुलतान्सने 262 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात क्वेटाच्या संघाने 253 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना टी-20 क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा संघाने 250 धावांचा आकडा गाठला. वेस्ट इंडिजच्या डावात 22 तर दक्षिण आफ्रिकेच्या डावात 13 षटकार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT