South Africa vs India T20 Series 2023 Match 1 sakal
क्रीडा

IND vs SA T20 : पहिल्या टी-20 सामन्याआधी संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे स्टार खेळाडू बाहेर

Kiran Mahanavar

South Africa vs India T20 Series 2023 Match 1 : एकदिवसीय वर्ल्ड कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिकेनंतर आता भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. टीम इंडिया रविवारपासून (10 डिसेंबर) तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू करत आहे. पहिला सामना डर्बनमध्ये खेळवला जाईल.

पहिल्या टी-20 सामन्याआधी संघाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज लुंगी एनगिडी या सामन्यासाठी बाहेर पडला असून, त्याची जागा बुरेन हेंड्रिक्स घेतील.

लुंगी एनगिडीच्या डाव्या घोट्याला दुखापत झाल्यामुळे भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतून बाहेर पडला. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने एका निवेदनात म्हटले आहे की, लुंगी एनगिडीला दुखापतीमुळे संघातून बाहेर करण्यात आले आहे, त्यांच्यावर दक्षिण आफ्रिकेच्या वैद्यकीय पथक देखरेख करत आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज बुरेन हेंड्रिक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. लुंगी एनगिडी शेवटचा एकदिवसीय सामना वर्ल्ड कप 2023 च्या लीग टप्प्यात खेळला होता.

तेहतीस वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज हेंड्रिक्सने 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी टी-20 फॉर्मेटमध्ये शेवटचा सामना खेळला. त्याने 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25 बळी घेतले आहेत. त्याच्या नावावर 8 एकदिवसीय सामन्यात 6 आणि 1 कसोटीत 6 विकेट्स आहेत.

भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा टी-20 संघ : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके, नॅंद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सेन, हेन केनलाहस महाराज, डेव्हिड मिलर, ब्यूरन हेंड्रिक्स, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाद विल्यम्स.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा. उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT