South Africa Quinton De Kock To Retire From ODI Cricket 
क्रीडा

World Cup 2023 : 'हा वर्ल्डकप शेवटचा', संघाची घोषणा झाल्यानंतर 30 वर्षांच्या खेळाडूने जाहीर केली निवृत्ती

Kiran Mahanavar

South Africa Quinton De Kock To Retire From ODI Cricket : आयसीसी वर्ल्डकप 2023 साठी दक्षिण आफ्रिकेने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दरम्यान, एक मोठी बातमीही समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार क्विंटन डी कॉकने वर्ल्डकप 2023 नंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

डिकॉक अवघ्या 30 वर्षांचा असून त्याने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी 140 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ट्रिस्टन स्टब्स आणि डेवाल्ड ब्रेविस या युवा फलंदाजांची वर्ल्ड कप संघात निवड झालेली नाही. या दोघांची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली होती, मात्र दोघांनाही वर्ल्ड संघात स्थान मिळू शकले नाही.

डी कॉकची वनडे कारकीर्द कशी राहिली?

डिकॉकने वनडे क्रिकेटमधील पहिला सामना 2013 मध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळला होता. त्याने आतापर्यंत 140 एकदिवसीय सामने खेळले असून 44.85 च्या सरासरीने 5,966 धावा केल्या आहेत. 178 च्या सर्वोत्तम स्कोअरसह त्याने 17 शतके आणि 29 अर्धशतके केली आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 96.08 आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 वेळा नाबाद राहिला आहे. त्याने वनडेमध्ये 687 चौकार आणि 93 षटकारही मारले आहेत.

वर्ल्ड कप 2023 साठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सेन, हेन्रिक क्लासेन, सिसांडा मगला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, कारिचबा नोरखिया , तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर डसेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT