South Africa scores 129 before lunch in 3rd test
South Africa scores 129 before lunch in 3rd test 
क्रीडा

INDvsSA : आफ्रिकेवर पुन्हा फॉलोऑनचे सावट; अर्धा संघ माघारी

वृत्तसंस्था

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातही तिसऱ्याच दिवशी आफ्रिकेवर फॉलोऑनचे ढग दाटून आले. रोज कमी प्रकाशामुळे दिवसाचा खेळ लवकर संपत असताना भारतीय संघ सामना सवकर संपवण्याचाच विचार करत असेल. 

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर भरवशाच्या उमेश यादवने पहिल्याच षटकात आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसला केवळ एका धावेवर बाद केले. त्यानंतर आफ्रिकेला जवळपास 30 धावा जोडता आल्या आणि जडेजाने हम्जाची विकेट काढली. त्याने बराचवेळ टिच्चून फलंदाजी करत 62 धावा केल्या होत्या आणि त्याही केवळ 79 चेंडूंमध्ये. त्याने त्याच्या खेळीत तब्बल 10 चौकार मारले. 

28व्या षटकात हम्जा बाद झाल्यावर त्याच्यापाठोपाठ 29व्या षटकात नदीमने बावुमाला 32 धावांवर बाद केले. त्यानंतर जडेजाने 32 व्या षटकात क्लासेनलाही बाद केले आणि आफ्रिकेवर पुन्हा पराभवाचे ढग दाटू लागले. 

उपहारापर्यंत आफ्रिकेचा अर्धा संघ माघारी फिरला आहेय आणि अजूनही ते 368 धावांनी मागे आहेत. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा फॉलोऑनचे संकट जमा होऊ लागले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT