South Africa vs India esakal
क्रीडा

भारताने सेंच्युरियनवर दक्षिण आफ्रिकेचा केला पाडाव

अनिरुद्ध संकपाळ

सेंच्युरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील पहिली कसोटी भारताने ११३ धावांनी जिंकत आफ्रिकेतला आपला चौथा कसोटी विजय साजरा केला. भारताने आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव १९१ धावात संपुष्टात आला. भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. (South Africa vs India 1st Test Day 5)

भारताकडून पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शामीने भेदक मारा केला. या दोघांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. त्यांना मोहम्मद सिराज आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी २ विकेट घेत चांगली साथ दिली. आफ्रिकेकडून कर्णधार डीन एल्गरने ७७ धावांची झुंजार खेळी केली. त्याला टेंबा बाऊमाच्या नाबाद ३५ धावांच्या खेळीची साथ देखील लाभली. मात्र भारतीय वेगवान माऱ्यासमोर इतर फलंदाजांचा टिकाव लागला नाही.

तत्पूर्वी, भारताने पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर केएल राहुलच्या (KL Rahul) दमदार १२३ धावांच्या शतकी खेळीमुळे भारताने ३२७ धावांपर्यंत मजल मारली. त्याला अजिंक्य रहाणेने ४८ तर विराट कोहलीने ३५ धावांची खेळी करुन चांगली साथ दिली.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावात संपवला. मोहम्मद शामीने ४४ धावात आफ्रिकेचा निम्मा संघ बाद केला. भारताने (Indian National Cricket Team) दुसऱ्या डावात १७४ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३०५ धावांचे आव्हान ठेवले. मात्र दक्षिण आफ्रिकेला १९१ धावांपर्यंतच मजल मारता आली.

(South Africa vs India 1st Test Day 5)

लंचनंतर आफ्रिकेला अश्विनने गुंडाळले, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ११३ धावांनी विजय

डिकॉक - मुल्डरही परतले, भारत विजयापासून तीन विकेट दूर

अखेर कर्णधार एल्गरची ७७ धावांची झुंजार खेळी जसप्रीत बुमराहने संपवली, दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ १३० धावात परतला.

दक्षिण आफ्रिकेचे शतक पार, एल्गरने केली दिवसाची आक्रमक सुरुवात

भारताच्या विजयात डीन एल्गर ठरु शकतो अडचण

भारताला विजयासाठी ६ विकेटची गरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : हिंजवडीमध्ये १८ तासांपासून बत्ती गूल

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT