South Africa Vs India 2nd Test esakal
क्रीडा

SA vs IND : 147 वर्षाच्या क्रिकेट इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; भारत - दक्षिण आफ्रिका कसोटीत विक्रमांचा पाऊस

अनिरुद्ध संकपाळ

South Africa Vs India 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील तीन डाव अवघ्या चार सत्रात संपुष्टात आले. पहिल्या डावात भारताने 98 धावांची आघाडी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 176 धावात गुंडाळला.

भारताने आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावात संपुष्टात आणला होता. त्यानंतर भारताने पहिल्या डावात 153 धावा केल्या. पहिल्या दिवशीच विक्रमी 23 विकेट्स पडल्या. याचबरोबर आता तब्बल 137 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला गेला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन डाव 600 चेंडूंच्या आत संपुष्टात आले आहे.

यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये 600 चेंडूंच्या आत एका सामन्यातील तीन डाव संपुष्टात आले नव्हते. यापूर्वी 1888 मध्ये इंग्लंडच्या लॉर्ड्सवर 604 चेंडूत तीन डाव संपुष्टात आले होते. हा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. मात्र केप टाऊनमध्ये भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात 570 चेंडूतच 30 विकेट्स पडल्या. हा एक इतिहासच आहे.

कसोटी क्रिकेट सुरू होऊन 147 वर्षे झाली आहेत. या इतिहासात आतापर्यंत इतक्या कमी चेंडूत पहिल्यांदाच तीन डाव संपुष्टात आले. याचबरोबर केप टाऊन कसोटी ही क्रिकेट इतिहासात सर्वात कमी चेंडूत संपुष्टात आलेली कसोटी देखील ठरली. हा कसोटी सामना अवघ्या 642 चेंडूत संपुष्टात आला.

यापूर्वी 1932 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील मेलबर्न येथील कसोटी सामना 656 चेंडूत संपुष्टात आला होता. हा इतिहास आज केप टाऊनमध्ये मोडला गेला.

सर्वात कमी चेंडूत संपलेला कसोटी सामना

  • 642 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, केप टाउन, 2024

  • 656 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मेलबर्न, 1932

  • 672 - वेस्ट इंडीज विरूद्ध इंग्लंड, ब्रिजटाउन, 1935

  • 788 - इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया, मँचेस्टर, 1888

  • 792 - इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स, 1888

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतोय''

FSSAI Pan Masala Rules: पान मसाला खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! FSSAI चा कंपन्यांना दणका, नवे नियम लागू, जाणून घ्या काय बदललं?

Gold Price: सोन्यात १० हजारांची, तर चांदीत २० हजारांची उसळी; सुवर्ण बाजाराची तेजीकडे वाटचाल

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT