क्रीडा

Sa vs Ind 2nd Test : केपटाऊन कसोटीची इतिहासात नोंद! मोडला 134 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

South Africa vs India 2nd Test News | मोहम्मद सिराजचे सहा विकेट आणि दक्षिण आफ्रिकेचा 55 धावांत खुर्दा त्यानंतर....

Kiran Mahanavar

South Africa vs India 2nd Test : मोहम्मद सिराजचे सहा विकेट आणि दक्षिण आफ्रिकेचा 55 धावांत खुर्दा त्यानंतर भारत 4 बाद 153 आणि सर्व बाद 153 ... हाताशी आलेली वर्चस्वाची संधी भारतीय फलंदाजांनी मातीमोल केली. त्यानंतर आफ्रिकेने दुसऱ्या डावात 3 बाद 62 अशी सुरुवात केली. नाट्य घडलेल्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी 23 फलंदाज बाद झाले.

कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासातील ही सहावी वेळ आहे. जेव्हा एका दिवसात 23 किंवा त्याहून अधिक विकेट्स पडल्या आहेत. पण कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 23 विकेट पडण्याची ही दुसरी वेळ आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका दिवसात सर्वाधिक बळी पडण्याचा विक्रम इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात आहे. 1888 मध्ये लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण 27 विकेट पडल्या होत्या.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 23 किंवा त्याहून अधिक विकेट पडण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 1902 मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या पहिल्या दिवशी 25 विकेट पडल्या होत्या. 1890 मध्ये ओव्हल येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 22 विकेट पडल्या.

कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक विकेट्स

  • 25 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न, 1902

  • 23 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, केपटाऊन, 2024

  • 22 - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओव्हल, 1890

  • 22 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज, अॅडलेड, 1951

  • 21 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, गकेबरहा, 1896

कसोटीत एका दिवसात सर्वाधिक विकेट्स

  • 27 - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स, 1888 (दिवस 2)

  • 25 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न, 1902 (पहिला दिवस)

  • 24 - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओव्हल, 1896 (दिवस 2)

  • 24 - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, बेंगळुरू, 2018 (दिवस 2)

  • 23 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, केपटाऊन, 2011 (दिवस 2)

  • 23 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, केपटाऊन, 2024 (पहिला दिवस)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT