SA vs IND 3rd ODI
SA vs IND 3rd ODI  esakal
क्रीडा

SA vs IND 3rd ODI Live : टोनी डी जार्जीचे दमदार अर्धशतक; आफ्रेकेचीही कडवी फाईट

अनिरुद्ध संकपाळ

SA vs IND 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने 50 षटकात 8 बाद 296 धावा केल्या. भारताकडून संजू सॅमसनने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकत 114 चेंडूत 108 धावा केल्या. त्याला तिलक वर्माने 52 धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली.

भारताची अवस्था 2 बाद 49 धावा अशी झाली असताना संजू सॅमसनने तिसऱ्या विकेटसाठी केएल राहुल सोबत 52 त्यानंतर तिलक वर्मासोबत चौथ्या विकेटसाठी 116 धावांची शतकी भागीदारी रचली.

संजू सॅमसन बाद झाल्यानंतर रिंकू सिंह (27 चेंडूत 38 धावा), वॉशिंग्टन सुंदर (9 चेंडूत 14 धावा) यांनी भारताला 300 धावांच्या जवळ पोहचवण्याचा प्रयत्न केला. दक्षिण आफ्रिकेकडून बेऊरान हेंड्रिक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

120-2 (24 Ov) : टोनी डी जार्जीचे अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा सलामीवीर टोनी डी जार्जीने नाबाद अर्धशतक ठोकत संघाला 120 धावांपर्यंत पोहचवले. त्याने कर्णधार एडिन माक्ररमसोबत नाबाद अर्धशतकी भागीदारी देखील रचली.

59-1 (Reeza Hendricks, 8.2) : दक्षिण आफ्रिकेची दमदार सुरूवात

भारताचे 297 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने दमदार सुरूवात केली. त्यांनी पहिल्या 8 षटकात 59 धावा केल्या. सलामीवीर टोनी दे झोरजी आणि रीझा हेंड्रिक्सने संघाला 59 धावांपर्यंत पोहचवले. मात्र ही जोडी अर्शदीपने फोडली. त्याने रीझा हेंड्रिक्सला 19 धावांवर बाद केलं.

296-8 (50 Ov) : रिंकू - सुंदरची फटकेबाजी 

रिंकू सिंहने 27 चेंडूत 38 धावा तर वॉशिंग्टन सुंदरने 9 चेंडूत 14 धावा ठोकत भारताला 296 धावांच्या जवळ पोहचवलं.

248-5 (45.4 Ov) : शतकानंतर संजू बाद 

संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी केली. त्याने कारकिर्दीतील आपले पहिले शतक ठोकले. मात्र 114 चेंडूत 108 धावा करून तो बाद झाला.

 217-4 : तिलक अर्धशतकानंतर बाद 

तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने चौथ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचली. मात्र तिलक वर्मा 52 धावा करून बाद झाला.

185-3 (38.1 Ov) : संजू - तिलकची भागीदारी 

केएल राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या तिलक वर्माने संथ फलंदाजी केली. दरम्यान, संजूने आपले अर्धशतक पूर्ण केले. जवळपास 30 चेंडू खेळून 7 धावा करणाऱ्या तिलकनेही नंतर आक्रमक फलंदाजी करत धावगती वाढवली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली.

101-3 : भारताचा कर्णधार केएल राहुल बाद 

केएल राहुल आणि संजू सॅमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली होती. मात्र ही जोडी विआन मुलरने फोडली. त्याने केएल राहुलला 21 धावांवर बाद केलं.

53-2 (9 Ov) : साई सुदर्शन देखील बाद 

भारताचा दुसरा सलामीवीर साई सुदर्शन 10 धावा करून बाद झाला. त्याला हेंड्रिक्सने पायचीत पकडलं

34-1 : भारताला पहिला धक्का 

रजत पाटीदार आणि साई सुदर्शन यांनी 34 धावांची सलामी दिली. त्यानंतर मात्र भारताला पहिला धक्का बसला नांद्रे बर्जरने 16 चेंडूत 22 धावा करणाऱ्या पाटीदारला बाद केलं.

भारतीय संघात दोन बदल 

तिसऱ्या वनडे सामन्यात केएल राहुलने संघात दोन बदल केले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या ऐवजी रजत पाटीदारला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे तर कुलदीप यादवच्या जागी युझवेंद्र चहलला संधी मिळाली आहे.

SA vs IND 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने 50 षटकात 8 बाद 296 धावा केल्या. भारताकडून संजू सॅमसनने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकत 114 चेंडूत 108 धावा केल्या. त्याला तिलक वर्माने 52 धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली.

भारताची अवस्था 2 बाद 49 धावा अशी झाली असताना संजू सॅमसनने तिसऱ्या विकेटसाठी केएल राहुल सोबत 52 त्यानंतर तिलक वर्मासोबत चौथ्या विकेटसाठी 116 धावांची शतकी भागीदारी रचली.

संजू सॅमसन बाद झाल्यानंतर रिंकू सिंह (27 चेंडूत 38 धावा), वॉशिंग्टन सुंदर (9 चेंडूत 14 धावा) यांनी भारताला 300 धावांच्या जवळ पोहचवण्याचा प्रयत्न केला. दक्षिण आफ्रिकेकडून बेऊरान हेंड्रिक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT