south africa vs india 3rd t20 team india playing marathi news 
क्रीडा

SA vs IND Playing 11 : करो या मरो... दूसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात होणार 'हे' 3 मोठे बदल

Kiran Mahanavar

South Africa vs India 3rd T20 Playing 11 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर आज 14 डिसेंबरला खेळला जाणार आहे. मालिकेतील दुसरा सामना जिंकून यजमान दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे. पहिला सामना पावसाने वाहून गेला होता.

मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात काही मोठे बदल होऊ शकतो. ओपनिंग स्लॉटपासून मिडल ऑर्डरमध्ये बदल पाहिला मिळू शकतात. हा सामना भारतीय संघासाठी करो या मरो अशी परिस्थिती आहे, कारण हा सामना हारला तर संघ मालिका गमावेल.

पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरलेल्या यशस्वी जैस्वालला बाहेर बसावे लागू शकते. त्याच्या जागी ऋतुराज गायकवाड खेळू शकतो, जो शुभमन गिलसोबत ओपनिंग करताना दिसणार आहे. शेवटच्या मालिकेत उपकर्णधार श्रेयस अय्यर परतणार असल्याने तिसऱ्या क्रमांकावर बदल होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तिलक वर्मालाही बाहेर बसावे लागू शकते. दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरला विश्रांती देण्यात आली होती.

कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर येईल, ज्याने मागील सामन्यात अर्धशतक झळकावले होते. मात्र पाचव्या क्रमांकावर जितेश शर्माच्या जागी इशान किशन यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पुनरागमन करू शकतो.

या स्थितीत रिंकू सिंग सहाव्या क्रमांकावर फिनिशरची भूमिका बजावू शकते. या मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार रवींद्र जडेजा 7 व्या क्रमांकावर असेल. संघातील आणखी एक फिरकी गोलंदाज कुलदीप यादव असेल, तर तीन वेगवान गोलंदाज मुकेश कुमार, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज असतील.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone Security Alert: ‘आयफोन’ वापरत असाल तर आताच करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचा फोन होणार हॅक!

AAP Pune Manifesto : पुणे पालिकेसाठी 'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना मोफत बस प्रवास आणि 'मोहल्ला क्लिनिक'चे आश्वासन!

Sangli Election : एकाच प्रभागात अनेक दावे, अनेक गट, भाजपची अंतर्गत फूट, राष्ट्रवादीची जातीय मांडणी; प्रभाग आठ बनला रणांगण

Mumbai - Goa Highway : कोकणाच्या विकासाचा कणा अजूनही खड्ड्यातच; मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा अंत न दिसणारा प्रवास

Latest Marathi News Live Update : पुणे – नाशिक महामार्गावर रास्तारोको, वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT