Kuldeep Yadav  esakal
क्रीडा

SA vs IND 3rd T20I : कुलदीपचा पंजा! भारताचा टी 20 क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय

अनिरुद्ध संकपाळ

India Vs South Africa 3rd T20I : भारताचे 202 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची कुलदीप यादवच्या फिरकीपुढे दैना उडाली. त्यांना संपूर्ण संघ अवघ्या 94 धावात गाशा गुंडाळून पॅव्हेलियनमध्ये पोहचला. भारताने सामना 106 धावांनी जिंकत टी 20 क्रिकेट इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला. भारताचे या विजयाबरोबरच मालिका 1 - 1 अशी बरोबरीत संपवली.

कुलदीपने 17 धावात 5 विकेट्स घेतल्या तर आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने एकाकी झुंज देत 35 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून फक्त तीन फंलदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. मिलर सोडून डोनोवान फेरेरियाने 12 तर कर्णधार एडिन माक्ररमने 25 धावा केल्या.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 7 बाद 201 धावा केल्या. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने 56 चेंडूत दमदार शतकी खेळी केली. त्याला यशस्वी जयस्वालने 41 चेंडूत 60 धावा करत चांगली साथ दिली.

95-10 (13.5 Ov) : कुलदीप यादवच्या फिरकीत आफ्रिकेने खालल्या गटांगळ्या

कुलदीप यादवने दमदार गोलंदाजी करत फक्त 17 चेंडू गोलंदाजी केली अन् 17 धावा देत आफ्रिकेचा निम्मा संघ गारद केला. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 106 धावांनी पराभव केला.

77-5 (10.2 Ov) : दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ गारद 

भारताचे 202 धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा भारतीय गोलंदाजांनी निम्मा संघ 75 धावात गारद झाला.

सूर्यकुमार यादवचे दमदार शतक 

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने करो या मरो सामन्यात दमदार शतक ठोकत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली.

154-3 (15.2 Ov) : सूर्या तळपला 

यशस्वी जयस्वाल आणि सूर्यकुमार यादवने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचल्यानंतर यशस्वी 60 धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्याने डावाची सूत्रे हातात घेत संघाला 16 व्या षटकात 150 धावांचा टप्पा पार करून दिला.

108-2 (12 Ov) : यशस्वीचे अर्धशतक

यशस्वी जयस्वालने दमदार अर्धशतक ठोकत सूर्यासोबत नाबाद 80 धावांची भागीदारी रचली. सूर्या देखील आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता.

IND 64/2 (7) : सूर्या - यशस्वीची भागीदारी 

गिल अन् तिलक पाठोपाठच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार सूर्यकुमार यादव आणि सलामीवीर यशस्वी जयस्वालने तिसऱ्या विकेटसाठी दमदार भागीदारी रचली. या दोघांनी सातव्या षटकात संघाला 64 धावांपर्यंत पोहचवले.

भारताला पाठोपाठ दोन धक्के

भारताने 2 षटकात बिनबाद 29 धावा केल्या होत्या. मात्र तिसऱ्या षटकात केशव महाराजने शुभमन गिलला 12 धावांवर आणि पुढच्याच चेंडूवर तिलक वर्माला शुन्यावर बाद करत भारताची अवस्था 2 बाद 29 धावा अशी केली.

भारताच्या संघात कोणताही बदल नाही

भारताने तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT