RSA vs IND
RSA vs IND Twitter
क्रीडा

RSA vs IND : तिसऱ्या दिवसाअखेर आफ्रिका 2 बाद 101 धावा

अनिरुद्ध संकपाळ

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव 198 धावांत आटोपला. यात शंभर धावा एकट्या पंतने काढल्या. या धावांच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करतान दक्षिण आफ्रिकेनं दोन विकेट गमावल्या आहेत. मात्र त्यांनी जवळपास निम्म्या धावा केल्याही आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपता संपता टीम इंडियाला एल्गरच्या रुपात मोठे यश मिळाले. त्याने 96 चेंडूत 30 धावा केल्या. त्याआधी शमीनं मार्करमला 16 धावांवर माघारी धाडले होते. किगन पीटरसन 48 धावावर नाबाद खेळत होता. तिसऱ्या दिवसाअखेर आफ्रिकेने 2 बाद 101 धावा केल्या होत्या. आफ्रिकाल जिंकण्यासाठी अजून 111 धावांची गरज आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय संघाला 8 विकेट्स घ्यावा लागतील.

तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारत 2 बाद 57 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात करेल. दोन्ही संघांच्या दृष्टीने तिसऱ्या दिवशीचे पहिले सत्र महत्वाचे आहे. दिसऱ्या दिवसअखेर भारताचा कर्णधार विराट कोहली 14 तर चेतेश्वर पुजारा 9 धावा करुन नाबाद होते. भारताला सध्या दुसऱ्या डावात ७० धावांची आघाडी मिळाली आहे. (South Africa vs India 3rd Test Day 3 Virat kohli Cheteshwar Pujara)

भारताने तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात २२३ धावा केल्या होत्या. यात विराट कोहलीच्या ७९ धावांचा मोठा वाटा होता. त्यानंतर जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत दिक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावात गुंडाळला. बुमराहने आफ्रिकेचा निम्मा संघ गारद केला. भारताने पहिल्या डावात १३ धावांची माफक पण महत्वपूर्ण आघाडी घेतली.

  • 101/2 : बुमराहने दक्षिण आफ्रिकेला दिला दुसरा धक्का, डिन एल्गर 96 चेंडूत 30 धावा करुन माघारी

  • 23-1 : दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का मार्करमच्या रुपात शमीनं संघाला मिळवून दिले पहिले यश

  • दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य

  • 198-10 : बुमराहला बाद करत आफ्रिकेनं टीम इंडिया दुसरा डावं दोनशेच्या आत आटोपला

पंतच दिमाखदार शतक

  • 189-9 : शमीनं दहा चेंडू खेळले पण मोर्कोच्या चेंडूवर तो शून्यावर बाद होऊन तंबूत परतला.

  • 180-8 : उमेश यादवच्या रुपात भारताचा आठवा फलंदाजही बाद, भारताकडे १९३ धावांची आघाडी

  • 170-7 : शार्दुलनेही केली निराशा, ५ धावा करुन झाला बाद

  • 162-6 : अश्विनने ७ धावा करत सोडली ऋषभ पंतची साथ, भारत

  • उपहारानंतर आफ्रिकेने विराट - पंत जोडी फोडली, विराट १४३ चेंडू खेळून २९ धावांवर झाला बाद

  • ऋषभ पंतचे दमदार अर्धशतक, भारताची दीडशतकी भागीदारीकडे कूच

  • भारताकडे १०३ धावांची आघाडी, विराट आणि पंत देतायत झुंज

  • 58-4 : तिसऱ्या दिवशी सुरुवातीलाच भारताला दोन धक्के; चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे अपयशी जोडी पुन्हा अपयशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT