Rishabh Pant  BCCI FB PC By Ashley Vlotman
क्रीडा

RSA vs IND : पंत एकटा नडला; 'शान' अन् 'जान'दार सेंच्युरी!

सुशांत जाधव

शॉट सिलेक्शनमध्ये चुका करुन तो संघाला गोत्यात आणतोय, अशी टिका त्याच्यावर करण्यात येत होती.

South Africa vs India, 3rd Test Day 3, Rishabh Pant Latest News : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात रिषभ पंत टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर त्याने एकाकी खिंड लढवली. एका बाजूला विराट कोहली पुजारा स्टाइल संयमी खेळी करत होता. तर दुसऱ्या बाजूला पंतने आपल्या नैसर्गिक खेळीनं संघाला दबावातून बाहेर काढणारी खेळी केली. कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक त्याने पूर्ण केले. शॉट सिलेक्शनमध्ये चुका करुन तो संघाला गोत्यात आणतोय, अशी टिका त्याच्यावर करण्यात येत होती. मात्र या सगळ्याला त्याने आपल्या बॅटमधून उत्तर दिले.

पण त्याने पुन्हा एकदा संघ व्यवस्थापक आपल्यावर वारंवार का विश्वास ठेवत आहे, याची झलक दाखवून दिली. पंतने कसोटी कारकिर्दीतील जी चार शतके झळकावली आहेत त्यातील तीन शतक ही आशिया बाहेरच्या मैदानातील आहेत. 2018 मध्ये इंग्लंडच्या ओव्हलच्या मैदानात त्याने 114 धावांची खेळी केली होती. 2018-19 च्या दौऱ्यात सिडनीच्या मैदातही पंतने दिमाखदार खेळ दाखवला होता. यावेळी त्याने 159 धावांची नाबाद खेळी साकारली होती. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेत संघ अडचणीत असताना त्याने नाबाद शतकी खेळी करुन संघाचा डावा सावरला. पंतच्या चार शतकापैकी एक शतक हे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील आहे. जे त्याने इंग्लंड विरुद्ध झळकावले होते.

रिषभ पंतने नव्वदीच्या आणि घरातील खेळीही चांगल्याच गाजल्या होत्या. त्याच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन मैदान मारले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची त्याची खेळा पाहणाऱ्याला कदाचित सिडनी आणि गाबाचं मैदान आठवलंही असले. अगदी तेच गणित इंथही जुळलं तर दक्षिण आफ्रिकेच्या मैदानातील पंतचं नाबाद शतक सामन्यासह मालिकेचा निकाल ठरवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT