Virat Kohli Sakal
क्रीडा

Cricket Test Match : परदेशातील प्रतिष्ठा भारताला सिद्ध करण्याची वेळ

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची संधी या वेळीही हुकली असली तरी किमान बरोबरी साधण्यासाठी येत्या बुधवारपासून सुरू होणारा दुसरा आणि अंतिम सामना जिंकणे भारताला अनिवार्य आहे.

सुनंदन लेले (saptrang.saptrang@gmail.com)

केपटाऊन - दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची संधी या वेळीही हुकली असली तरी किमान बरोबरी साधण्यासाठी येत्या बुधवारपासून सुरू होणारा दुसरा आणि अंतिम सामना जिंकणे भारताला अनिवार्य आहे. भारतीय संघ परदेशात कसोटीमध्ये चांगला खेळ करु शकतो हे सिद्ध करण्याची वेळ भारतीय संघावर आली आहे.

नव वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ नव्या उत्साहाने न्यूलँडस् मैदानावर सरावासाठी दाखल झाला. नेटमधील सरावाची एक सुविधा मैदानात मुख्य खेळपट्टी शेजारी केली होती. दुसरी सुविधा मैदानाबाहेर होती. सगळे खेळाडू आळीपाळीने दोनही सुविधांचा वापर करत सविस्तर सराव करताना दिसले.

सराव करत असताना विराट कोहलीशी भेट झाली, तो म्हणाला, गेले काही महिने मी फोन पासून जरा लांब होतो. मैदानावर जसे बरेच काही चालू होते तसेच मैदानाबाहेरही बरेच काही चालू आहे. नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देत विराट पुन्हा सरावाकडे वळला.

...तरीही फलंदाजांची सत्वपरीक्षा

न्यूलँडस् मैदानाची खेळपट्टी दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी तयार केली जात होती. अपेक्षेइतके गवत खेळपट्टीवर दिसले नाही. म्हणजेच आता हे नक्की आहे की कसोटी सामन्यादरम्यान एकदम हिरवीगार खेळपट्टी नसणार. तरीही खेळपट्टी पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना मदत करणार आहे अशी खात्री खेळपट्टी तयार करणार्‍या माळ्याने दिली.

पत्रकार परिषदेसाठी टाळाटाळ

पहिल्या कसोटीत फलंदाजी आणि गोलंदाजी दोनही क्षेत्रात मोठे अपयश आल्याने सामन्याचे दोन दिवस अगोदर पत्रकारांशी बोलायला कोणाला पाठवायचे हा प्रश्न होता. के एल राहुल आणि विराट कोहलीने फलंदाजीत आणि जसप्रीत बुमराने गोलंदाजीत थोडी चांगली कामगिरी केली होती.

के. एल. राहुल पहिल्या कसोटी दरम्यान पत्रकारांशी वार्तालाप करून गेला होता पत्रकारांना फलंदाजी किंवा गोलंदाजी प्रशिक्षकांशी बोलण्यात खास रस नव्हता. परिणामी सामन्याच्या दोन दिवस अगोदर भारतीय संघातील कोणीच पत्रकारांशी बोलायला आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT