International Cricket Council
International Cricket Council esakal
क्रीडा

ICC ची मोठी कारवाई; दक्षिण आफ्रिकेच्या 'या' क्रिकेटपटूवर घातली 9 महिन्यांची बंदी

सकाळ डिजिटल टीम

खेळाडू चांगल्या कामगिरीसाठी अनेकदा औषधांचं सेवन करत असतात.

दुबई : खेळाडू चांगल्या कामगिरीसाठी अनेकदा औषधांचं सेवन करतात. या गोष्टी रोखण्यासाठी जगभरात सर्व प्रकारचे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची नियमितपणे डोपिंग टेस्ट (Doping Test) केली जाते. जर एखादा खेळाडू अशा प्रकारच्या डोपिंग टेस्टमध्ये आढळला तर त्याच्यावर कारवाई देखील होते. अशीच कारवाई आता एका क्रिकेटपटूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (International Cricket Council) केलीय.

आयसीसीच्या (ICC) डोपिंग विरोधी समितीनं दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फलंदाज जुबैर हमजा (Zubayr Hamza) याला वारंवार अंमली पदार्थाचं सेवन केल्याप्रकरणी दोषी ठरवलंय. या वर्षी 17 जानेवारी रोजी त्याची डोपिंग टेस्ट करण्यात आली होती, त्याचा निकाल पॉझिटिव्ह आला होता. आता आयसीसीनं हमजाला 9 महिन्यांसाठी निलंबित केलंय. त्यामुळं हमजावर 22 मार्च 2022 पासून बंदी घालण्यात आलीय. जी 22 डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. यासह 17 जानेवारी ते 22 मार्च 2022 पर्यंतची त्यांची वैयक्तिक कामगिरी अवैध ठरवण्यात आलीय.

Zubayr Hamza

जुबैर हमजानं दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत 6 कसोटी आणि एक वनडे सामना खेळलाय. त्यानं या कालावधीत केलेल्या 31 धावा (25 आणि 6) त्याला गमवाव्या लागणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत त्यानं या धावा केल्या होत्या. 26 वर्षीय हमजाची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कामगिरी उत्कृष्ट राहिलीय. त्यानं 78 सामन्यांच्या 130 डावांमध्ये 46 च्या सरासरीनं 5271 धावा केल्या आहेत. हमजानं 13 शतकं आणि 26 अर्धशतकं झळकवली आहेत. म्हणजेच, 39 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यानं नाबाद 222 धावांची सर्वात मोठी खेळी खेळलीय.

मात्र, जुबैर हमजाला कसोटीत चांगली कामगिरी करता आली नाहीय. त्यानं 6 कसोटी सामन्यांच्या 12 डावात 18 च्या सरासरीनं 212 धावा केल्या आहेत. शिवाय, एका वनडेत 56 धावा तर T20 मध्ये 31 च्या सरासरीनं त्यानं 639 धावा केल्या आहेत. एक शतक आणि 4 अर्धशतकं झळकावली आहेत. मात्र, यावर्षी तो आता क्रिकेट खेळू शकणार नाहीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT