Rafael Nadal pulled out Wimbledon semi-final Due To abdominal strain ESAKAL
क्रीडा

Rafael Nadal announces retirement : 'लाल'मातीवरील बादशाह राफेल नदालची निवृत्तीची घोषणा, २२ ग्रँड स्लॅम जेतेपदं नावावर

Rafael Nadal retirement : आपल्या आक्रमक खेळाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा टेनिसपटू राफेल नदाल निवृत्त होतोय... दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याच्यासमोर खऱ्या अर्थानं आव्हान उभं करणारा राफेल होता.

Swadesh Ghanekar

Rafael Nadal Retirement : दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने निवृत्ती जाहीर केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या डेव्हिस कप फायनलनंतर तो टेनिस कोर्टवरून निवृत्ती घेणार आहे. स्पॅनियार्ड गेल्या काही वर्षांत दुखापतींशी झुंजत आहे आणि २०२३ मध्ये त्याने निवृत्तीचे संकेत दिले होते. आज त्याने तशी घोषणा केली.

३८ वर्षीय राफेलने कारकीर्दित २२ ग्रँडस्लॅम जेतेपदं नावावर केले आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्याने म्हटले की,'मी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेत आहे, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. मागील काही वर्ष माझ्यासाठी आव्हानात्मक होती, हे सत्य आहे. मला वाटत नाही की मी मर्यादांशिवाय खेळू शकलो आहे.हा साहजिकच कठीण निर्णय आहे, ज्यासाठी मला थोडा वेळ लागला आहे.''

राफेलने २००९ व २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेची सर्वोत्तम १४ जेतेपदं नावावर केली आहेत. विम्बल्डनची( २००८ व २०१०) दोन आणि अमेरिकन ओपन ( २०१०, २०१३, २०१७ व २०१९) चार जेतेपदं त्याने जिंकली आहेत.

  • सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये राफेल नदाल ( २२) दुसऱ्या स्थानावर आहे

  • टेनिसच्या इतिहासात सर्वाधिक जेतेपदं जिंकणाऱ्या खेळाडूंमध्येही राफेल नदाल ( ५९) दुसऱ्या स्थानावर आहे

  • ATP Ranking मध्ये राफेल नदाल ९१२ आठवडे टॉप टेनमध्ये होता.

  • लाल मातीत त्याने सर्वाधिक ६३ जेतेपदं जिंकली आहेत आणि त्यात १४ फ्रेंच ओपन स्पर्धेच्या जेतेपदांचा समावेश आहे.

राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच या तीन दिग्गजांचा खेळ पाहून टेनिसच्या प्रेमात पडलेल्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे. फेडररनंतर नेस्ट बेस्ट असे नदालला म्हटले गेले आणि त्याने त्याच्या खेळातून ते सिद्धही केले. त्याला टक्कर देण्यासाठी नोव्हाक कोर्टवर होताच. पण, या तिघांनी एक दशक गाजवले आणि आता त्यांच्या निवृत्तीचे सत्र सुरू झाले आहे. वयाची २० ओलांडण्यापूर्वीच राफेलने १६ जेतेपदं नावावर केली होती आणि त्यात फ्रेंच ओपन स्पर्धेचाही समावेश होता.२००८च्या विम्बल्डन फायनलमध्ये फेडररला पराभूत करून तो चर्चेत आला आणि त्यावेळी त्याने जागतिक क्रमवारीत नंबर वन स्थानही पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT