Brijbhushan Singh Esakal
क्रीडा

Brijbhushan Singh : ब्रिजभूषण यांना मोठा धक्का! लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर विशेष बैठक रद्द

भारतीय कुस्ती महासंघाची रविवारी नियोजित करण्यात आलेली विशेष सभा रद्द

सकाळ डिजिटल टीम

भारतीय कुस्ती महासंघाची रविवारी नियोजित करण्यात आलेली विशेष सभा रद्द करण्यात आली आहे. ऑलिंपियन कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपानंतर क्रीडा खात्याने कुस्ती महासंघाच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घातल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांची चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. सहसचिव विनोद तोमर यांनाही पदावरून दूर करताना कुस्ती महासंघाने आपले पुढील सर्व उपक्रम तात्काळ थांबवावेत, असा आदेशच क्रीडा खात्याने दिल्यामुळे विशेष सर्वसाधारण सभा रद्द करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उत्तर प्रदेशमधील गौंडा येथे होणारी मानांकन कुस्ती स्पर्धाही स्थगित करण्यास सांगण्यात आले आहे.

कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपावर सविस्तर लेखी खुलासा आपले वडील करणार आहेत, अशी माहिती ब्रिजभूषण शरण यांचा मुलगा प्रतीक याने दिली होती; परंतु क्रीडा खात्याने त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमल्यावर आणि त्यांना तोपर्यंत पदावरून दूर रहाण्याचे आदेश दिल्यानंतर ब्रिजभूषण यांना काढता पाय घ्यावा लागला.

क्रीडा खात्याने समितीच्या सदस्यांची घोषणा अजून केलेली नाही; परंतु महिनाभरात ही समिती आपला अहवाल देईल, असे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी स्पष्ट केले आहे. कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांनी ब्रिजभूषण हटाव ही मोहीम लावून धरली आहे. शुक्रवारी त्यांनी पी. टी. उषा अध्यक्ष असलेल्या भारतीय ऑलिंपिक समितीची भेट घेतली आणि ब्रिजभूषण यांच्याविरोधात अन्यायाचा पाढा वाचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT