Sport sakal
क्रीडा

IPL 2023 : गतविजेते अन्‌ उपविजेत्यांमध्ये लढाई, पांड्या आणि टीम पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक

आयपीएल : राजस्थान-गुजरात यांच्यामध्ये जयपूर येथे रस्सीखेच

सकाळ वृत्तसेवा

जयपूर - यंदाच्या आयपीएलमध्ये मोसमातील दोन अव्वल संघांमध्ये उद्या लढत रंगणार आहे. गतविजेता संघ गुजरात टायटन्स व गतवेळचा उपविजेता संघ राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये जयपूर येथे ही लढत पार पडणार आहे.

दोन संघांमधील मागील लढत राजस्थान रॉयल्सने जिंकली असल्यामुळे आता शुक्रवारच्या लढतीत गुजरात टायटन्सचा संघ पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक असेल.

सहा सामन्यांमध्ये विजय मिळवणारा गुजरात टायटन्सचा संघ मागील लढतीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभूत झाला. आता त्यांना विजयी पुनरागमन करण्याचा ध्यास लागला असेल. सातव्या विजयासाठी त्यांचा संघ प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.

राजस्थान रॉयल्सला मागील चारपैकी एकाच लढतीमध्ये विजय मिळवता आला आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव दिसून येत आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सचा संघ सहाव्या विजयाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवील.

यशस्वी जयस्वाल याने ९ सामन्यांमधून एक शतक व तीन अर्धशतकांसह ४२८ धावांचा पाऊस पाडला आहे. जॉस बटलर (२८९ धावा), संजू सॅमसन (२१२ धावा), शिमरॉन हेटमायर (२०५ धावा), देवदत्त पडीक्कल (१९४ धावा) यांना सातत्यपूर्ण फलंदाजी करता आलेली नाही.

राजस्थानसाठी हीच मोठी चिंतेची बाब आहे. यशस्वीसह इतर फलंदाज चमकल्यास त्यांना प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवता येऊ शकणार आहे.राजस्थानच्या गोलंदाजांनी आतापर्यंत आपला प्रभाव टाकला आहे. रवीचंद्रन अश्‍विन (१३ विकेट), युझवेंद्र चहल (१२ विकेट), ट्रेंट बोल्ट (१० विकेट), संदीप शर्मा (८ विकेट) यांनी वेळोवेळी संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे,

पण दबावाखाली फलंदाजांना आपला खेळ उंचावता आला नाही. त्यामुळे राजस्थानला मागील काही लढतींमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबईविरुद्धच्या लढतीत राजस्थानला सर्व बाबींमध्ये सपाटून मार खावा लागला. हा पराभव मागे टाकून त्यांचा संघ उद्या मैदानात उभा राहील.

दिल्ली लढतीने धडा मिळाला

गतवेळचा गुजरातचा संघ यंदाच्या मोसमातही छान खेळ करीत आहे. त्यांनी ९ पैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवून प्ले-ऑफच्या दिशेने वाटचाल केली आहे. पण दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत त्यांचा पराभव झाला.

१३१ धावांचे आव्हान त्यांना ओलांडता आले नाही. शुभमन गिल, डेव्हिड मिलर हे फलंदाज अपयशी ठरल्यास त्यांना फलंदाजीत अपयश येते, याचा धडा त्यांना मिळाला. कर्णधार हार्दिक पंड्या याने नाबाद ५९ धावांची खेळी साकारल्यानंतरही त्यांना निराशेला सामोरे जावे लागले.

शमी, राशीद, नूरवर

गोलंदाजीची मदार

गुजरातसाठी तीन वेगवान गोलंदाज प्रभावी ठरत आहेत. मोहम्मद शमी, राशीद खान व नूर अहमद ही त्यांची नावे. गेल्या काही सामन्यांमध्ये मोहित शर्मा यानेही अचूक टप्प्यात गोलंदाजी करीत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. हार्दिक पंड्या व जॉश लिटल हे पाचव्या गोलंदाजाची कमतरता भरून काढत आहेत.

आजची लढत

राजस्थान रॉयल्स-गुजरात टायटन्स

स्थळ- जयपूर

वेळ- संध्याकाळी ७.३० वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT