Sports Bulletin Sakal
क्रीडा

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

Sports News on 8th October 2024: ८ ऑक्टोबर रोजी क्रीडा विश्वात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

Vinesh Phogat Haryana Election: क्रीडा विश्वात आज अनेक घडामोडी घडल्या. हरियानाच्या विधानसभा निवडणुकीत कुस्तीपटू विनेश फोगाटने विजय मिळवला आहे, तसेच पाकिस्तान आयोजक असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल महत्त्वाचे अपडेट्सही समोर आले आहेत.

याशिवाय बांगलादेशच्या दिग्गज अष्टपैलूने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एकूणच दिवसभरात क्रीडा विश्वातील घडलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेतलेला आढावा.

Vinesh Phogat Won From Julana: हरियानाच्या विधानसभा निवडणुकीत ऑलिम्पिकपटू विनेश फोगाटने जुलाना या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. आज या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये विनेश फोगाटने बाजी मारत भाजपच्या योगेश कुमार यांचा पराभव केला. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

Mahmudullah - Shakib Al Hasan

Mahmudullah T20I Retirement: बांगलादेशच्या स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू महमुद्दुलाहने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताविरुद्धची चालू टी२० मालिका त्याची कारकिर्दीतील अखेरची मालिका असेल, असे त्याने स्पष्ट केले आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

Chris Woakes Catching Effort

Chris Woakes Catching Efforts: इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने बाऊंड्री लाईनजवळ पाकिस्तानी खेळाडू आघा सलमानचा झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला जीवदान मिळाले. महत्त्वाचे म्हणजे त्याने नंतर जीवदानाचा फायदा घेत शतक ठोकले. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

Champions Trophy 2025: चॅम्पियन ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. परंतु भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. गेल्या अनेक वर्षात दोन संघांमध्ये द्विपक्षीय मालिकाही झालेल्या नाहीत. अशातच आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT