Sports Minister Anurag Thakur Thomas Cup 2022 Winning Team ESAKAL
क्रीडा

थॉमस कप जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी केंद्राकडून 1 कोटीचं बक्षीस

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय पुरूष बॅडमिंटन (Badminton) संघाने 14 वेळा थॉमस कप (Thomas Cup 2022) जिंकणाऱ्या इंडोनेशियाचा पराभव करत इतिहास रचला. यापूर्वी गेल्या 70 वर्षात भारताच्या कोणत्याही संघाला थॉमस कपची फायनल गाठता आली नव्हती. या ऐतिहासिक कामगिरीनंतर राजकीय वर्तुळातून भारतीय पुरूष बॅडमिंटन संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच शुभेच्छांच्या वर्षावात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Sports Minister Anurag Thakur) यांनी या संघाला 1 कोटी (1 Crore) रूपयांचे बक्षीस जाहीर केले.

भारताने इतिहासात पहिल्यांदाच थॉमस कप फायनलमध्ये प्रवेश केला होता. आपल्या पहिल्याच फायनमध्ये भारतीय पुरूष संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. भारताने 14 वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियाचा परावभ केला. भारताने इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. भारत यापूर्वी थॉमस कपमध्ये 1952, 1955 आणि 1979 मध्ये सेमी फायनलपर्यंत पोहचला होता. तर महिला बॅडमिंटन संघाने 2014 आणि 2016 ला उबर कपच्या अंतिम चार संघात प्रवेश केला होता.

दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून 1 कोटी रूपयांच्या बक्षीसाची घोषणा केली. ठाकूर यांनी ट्विट केले की, 'भारतीय संघाने 14 वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियचा 3-0 असा पारभव केला. भारताने पहिल्यांदाच थॉमस कप पटकावला. भारतीय क्रीडाविभागाला या दैदिप्यमान विजयानंतर संघासाठी 1 कोटी रूपये बक्षीस जाहीर करताना आनंद होत आहे. आम्ही यासाठी नियमात शिथीलता देत आहोत.'

भारताच्या विजयी संघात लक्ष्य सेन, किदंबी श्रीकांत, एचसी प्रणॉय, दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिरा शेट्टी यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करताच आता लक्ष्मण हाकेंनी दिला इशारा

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT