भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झाच्या (sania mirza) दोन वर्षांच्या मुलाला इंग्लंडचा (England) व्हिसा मिळावा, यासाठी भारतीय क्रीडा मंत्रालयाने (India Sports Ministry) परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून इंग्लंडच्या सरकारकडे यासंदर्भात संपर्क करण्यात आलाय. सानिया मिर्झा UK तील स्पर्धेत सहभागी होताना मुलाला बरोबर नेऊ शकेल, यासाठी तिच्या मुलाला व्हिसा देण्यात यावा, अशी विनंती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून UK सरकारकडे करण्यात आलीये.
क्रीडा मंत्रालयाच्या ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ (टॉप्स) मध्ये सहभागी असलेल्या सानिया मिर्झाने आपल्या मुलाला आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या एका व्यक्तीसाठी व्हिसा मिळावा, अशी विनंती क्रीडा मंत्रालयाकडे केली होती. दोन वर्षांच्या मुलाला ठेवून महिन्याभरासाठी एखाद्या दौऱ्यावर जाऊ शकत नाही, असे सानिया मिर्झाने म्हटले होते. (sports ministry approached uk government to grant a visa to son of tennis player sania mirza)
सानिया मिर्झाचे लाखो चाहते आहेत. तिचा मुलगा अजहान हा देखील आईसोबत चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच आईसोबत कोर्टवरचा त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये एखाद्या कोचने सानियाला मार्गदर्शन द्यावे तसा हा क्वीच अजहान आपल्या आईला कोचिंग करत असल्याचे दिसले होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरलही झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.