Sports Ministry Reaction After Lovlina Borgohain Allegation Of Mental Harassments  ESAKAL
क्रीडा

Lovlina Borgohain : लोव्हलिनाच्या आरोपानंतर क्रीडा मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती लोव्हलिना बोरगोहैनने (Lovlina Borgohain) राष्ट्रकुल स्पर्धेआधीच मानसिक छळ होत असल्याची पोस्ट टाकत खळबळ उडवून दिली होती. आता या पोस्टनंतर भारतीय क्रीडा मंत्रालय अॅक्शन मोड मध्ये आले आहे. क्रीडा मंत्रालयाने (Sports Ministry) ट्विट करत इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनला विनंती केली.

क्रीडा मंत्रालयाने 'आम्ही इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनला विनंती करतो की त्यांनी लोव्हलिना बोरगोहैनच्या प्रशिक्षकांच्या अधिकृत मान्यतेची लवकरात लवकर सोय करावी.'

दरम्यान, लोव्हलिनाच्या ट्विटनंतर तिचे वडील टिकेन बोरगोहैन (Tiken Borgohain) मध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, 'हा खूप दुःखद प्रकार आहे. मात्र मला वाटते की तिने येणाऱ्या स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करावे आणि राष्ट्रकुल स्पर्धेत चांगली कामगिरी करावी. आम्हाला तिच्याकडून देशासाठी पदक मिळवण्याची अपेक्षा आहे.'

लोव्हलिनाचे वडील पुढे म्हणाले की, 'लोव्हलिनाने तिच्या प्रशिक्षकांना राष्ट्रकुल व्हिलेजमध्ये (Bermingham CWG village) प्रवेश नाकारल्यानंतर ट्विट केले. मी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सचिवांशी बोललो आहे. ते प्रशिक्षकांना राष्ट्रकुल व्हिलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT