पीवायसी हिंदू जिमखाना - आंतर-पेट्रोलियम सांघिक बििलयर्ड्‌स स्पर्धेत सर्वोच्च ब्रेकदरम्यान पॉटिंग करताना ‘ओएनजीसी’चा पंकज अडवानी. (दुसऱ्या छायाचित्रात) एस. एस. श्रीकृष्णा.
पीवायसी हिंदू जिमखाना - आंतर-पेट्रोलियम सांघिक बििलयर्ड्‌स स्पर्धेत सर्वोच्च ब्रेकदरम्यान पॉटिंग करताना ‘ओएनजीसी’चा पंकज अडवानी. (दुसऱ्या छायाचित्रात) एस. एस. श्रीकृष्णा. 
क्रीडा

पंकज अडवानीचा सर्वोच्च ब्रेक

सकाळवृत्तसेवा

पुणे - चौदाव्या आंतरपेट्रोलियम सांघिक बिलियर्डस स्पर्धेत पहिला दिवस मातब्बर पंकज अडवानी आणि नवोदित एस. श्रीकृष्ण यांनी गाजविला. ओएनजीसीच्या पंकजने १२४ गुणांचा सर्वोच्च ब्रेक नोंदविला, तर बीपीसीएलच्या एस. श्रीकृष्णाने नुकतीच सीसीआय स्नूकर स्पर्धा जिंकलेल्या ब्रिजेश दमानीवर मात केली.

ओएनजीसी आणि बीपीसीएल यांच्यात बुधवारी सकाळी दहा वाजता अंतिम सामना होईल. ओएनजीसी गतविजेता असल्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाला. 

पंकजने गेल संघाच्या इशप्रीत चढ्ढाविरुद्ध ही कामगिरी केली. यजमान बीपीसीएलसाठी शिष्यवृत्तीवर असलेल्या श्रीकृष्णाने ब्रिजेशविरुद्ध दोन अर्धशतकी ब्रेक नोंदविले. 

स्पर्धेचे उद्‌घाटन बीपीआरएलचे व्यवस्थापकीय संचालक अजय कुमार यांच्या हस्ते झाले. या वेळी बीपीसीएलचे उपसरव्यवस्थापक देवेंद्र जोशी, पीवायसी हिंदू जिमखान्याचे अध्यक्ष विजय भावे, बिलियर्डस-स्नूकर सेक्रेटरी शशांक हळबे यांच्या उपस्थितीत झाले.

निकाल -
सांघिक बिलियर्डस -
उपांत्य - ओएनजीसी विवि गेल २-० (पंकज अडवानी विवि इशप्रीत चढ्ढा २०८ (१२४)-६६, आलोक कुमार विवि आशुतोष पाधी २०० (८१, ६७)-४४). 
बीपीसीएल विवि इंडियन ऑइल २-० (एस. श्रीकृष्ण विवि ब्रिजेश दमानी २०० (६३, ५७)-५३, मनन चंद्रा विवि ध्वज हरिया २०२ (६१)-७३ (५७)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT