Deepa-Karmakar 
क्रीडा

राष्ट्रकुल स्पर्धा हुकल्याची खंत - दीपा

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - भारताची अव्वल जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकर हिने दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेस मुकावे लागण्याची खंत व्यक्त केली आहे. मात्र, त्याच वेळी याचवर्षी होणाऱ्या आशियाई स्पर्धेत पदक मिळविण्याची जिद्द आपण बाळगली असल्याचेही तिने स्पष्ट केले. 

गुडघ्याच्या दुखापतीमुळे दीपा ४ ते १५ एप्रिल दरम्यान होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही. रिओ ऑलिंपिक स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या दीपाने गुडघ्याची दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले. ती म्हणाली,‘‘दुखापत गंभीर नसून, त्यावरील उपचार प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हलकासा सराव करण्यास सुरवातही केली आहे. दुखापती या खेळाडूच्या कारकिर्दीचा जणू एक भागच बनलेल्या असतात. त्यावर मात करून खेळाडूला पुढे जायचे असते.’’

आशियाई स्पर्धेत दीपा व्हॉल्ट, अनइव्हन बार, बॅलन्स बीम, फ्लोअर एक्‍सरसाइज अशा चारही प्रकारावर लक्ष केंद्रित करणार आहे. दीपा म्हणाली, ‘‘चारही प्रकारांवर लक्ष केंद्रित करणार असले तरी, माझा सर्वाधिक भर हा व्हॉल्ट प्रकारावर असेल. एका क्रीडा प्रकाराची आवड लागली की तोच आपलासा होऊन जातो. त्यातच वर्चस्व मिळविण्याचा अधिक प्रयत्न होतो; पण मी अन्य प्रकारही आत्मसात करण्याचा प्रयत्न करणार आहे.’’

दोनच दिवसांपूर्वी भारताच्या अरुणा रेड्डी हिने जागतिक स्पर्धेत ‘व्हॉल्ट’ याच प्रकारात ब्राँझपदकाची ऐतिहासिक कामगिरी केली. दीपा म्हणाली, ‘‘तिच्या कामगिरीचा मला अभिमानच आहे. आम्ही एकत्रच सराव करतो. २०११ मध्ये ती राष्ट्रीय शिबिरात बिश्‍वेश्‍वर नंदी यांच्याकडे आली. त्यानंतर २०१४ ते २१०७ मध्ये आम्ही एकत्रच सराव करत होतो. तिने परदेशातही प्रशिक्षण घेतले आहे; पण ब्राँझपदक मिळविताना तिने मारलेल्या उडीचे तंत्र हे तिने नंदी सरांकडेच शिकले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT