क्रीडा

सिंधूचा संघर्ष

सकाळवृत्तसेवा

मोक्‍याच्या वेळी प्रतिकार करीत खेळ उंचावलेल्या सिंधूने जागतिक स्पर्धेतील आव्हान राखले. तिने चेऊंग यि हिला १९-२१, २३-२१, २१-१७ असे पराजित केले. सिंधूच्या खेळात सातत्याचा अभाव होता. पहिला गेम गमावलेल्या सिंधूने दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्धीस तीन मॅच पॉईंट दिले. निर्णायक गेममध्ये ११-४ आघाडीनंतर १२-१२ अशी बरोबरी स्वीकारली, पण अखेर तिने या ८७ मिनिटे चाललेल्या लढतीत विजय मिळविला.

सुरुवातीपासून अपेक्षित वर्चस्व न मिळाल्याने सिंधू काहीशी अस्वस्थ झाली होती. बेसलाईनवरून विजयी गुण मिळवून प्रतिस्पर्धी दडपण आणण्यात सिंधूला अपेक्षित यश नव्हते. अर्थात दुसऱ्या गेमच्या अंतिम टप्प्यात मोक्‍याच्यावेळी सावरत साधलेली बरोबरी तिच्या पथ्यावर पडली. त्याच जोरावर तिने निर्णायक गेममध्ये अडखळत्या सुरुवातीनंतर सात गुणांची आघाडी घेतली होती. याच गेमच्या अंतिम टप्प्यात प्रतिस्पर्धीला चुका करण्यास सिंधूने भाग पाडले. भारतीय चाहत्यांना श्‍वास रोखून धरण्यास भाग पाडलेल्या या लढतीत सिंधूने अडखळत, पण मोक्‍याच्यावेळी हल्ला करीत विजय मिळविला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: जिद्द, कष्ट आणि ध्येयवेड! ओमकार पेटेकर बनला डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश, विद्यार्थ्यांसाठी सुयश प्रेरणादायी..

​Pune News: पाषाणमधील रस्त्याची झाली कचराकुंडी; कचरा जाळल्याने रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT