क्रीडा

मेस्सीने गोल केला; रेफ्रींनी नाही पाहिला

वृत्तसंस्था

मेस्ताला - बहुतांशी सर्व खेळांत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होत असताना फुटबॉलमध्ये गोललाईन तंत्रज्ञान वापरण्यासाठी आग्रह धरला जात आहे. परंतु, अजूनही वास्तव दूर आहे आणि त्याचा फटका लिओनेल मेस्सी, तसेच त्याच्या बार्सिलोना क्‍लबला बसला. त्याने मारलेला गोल अर्धा फूट गोलजाळ्यात जाऊनही रेफ्रींनी तो नाकारला आणि स्पॅनिश स्पर्धेत बार्सिलोनाला वेलेन्सियाविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

स्पॅनिश फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोना व वेलेन्सिया यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे. बार्सिलोना गुणतक्‍त्यात आघाडी असली तरी रविवारचा सामना त्यांनी जिंकला असता, तर आघाडी अधिक भक्कम करण्याची त्यांना संधी होती.

या सामन्यात मेस्सीने ३० व्या मिनिटाला गोल केला. गोलजाळ्यात चेंडू अर्धा फूट आत गेलेला असताना वेलेन्सियाचा गोलरक्षक नेटोने हाताने चेंडू बाहेर फेकला. गोल झाल्याचे बार्सिलोना खेळाडूंना समजताच मेस्सीसह सर्वांनी जल्लोष करण्यास सुरवात केली; परंतु रेफ्री इग्नासिओ लेग्लेसियास यांच्या मनात काही वेगळे होते. गोल नाकारताना त्यांनी खेळ पुढे सुरू ठेवला.

मध्यंतराच्या या वादग्रस्त घटनेनंतर रॉड्रिगोने ६० व्या मिनिटाला वेलेन्सियाला आघाडीवर नेले; परंतु काही वेळातच जॉर्डी अल्बाने बार्सिलोनाला बरोबरी साधून दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याची शेतकऱ्यांना मोठी भेट! पहिली उचल प्रतिटन ३,९५१ रुपये; पुणे जिल्ह्यात सर्वाधिक

Dhule Mayor Mayadevi Pardeshi : राजकारणात खळबळ ! भाजपच्या महापौरांचा विष प्राशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न; आमदारांचा धक्कादायक खुलासा

Land Acquisition: राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी कोंढापुरी ग्रामस्थांचे खासदारांना साकडे

Marathi News Live Updates : कोंढव्यातील भाग्योदय नगर येथील इमारतीत 18 वाहनांना आग

Satara Teachers News: साताऱ्यात शिक्षकांवर प्रशासनाचा दणका! नऊ जण निलंबित, १३ जणांना बडतर्फीची नोटीस, धक्कादायक कराण आले समाेर?

SCROLL FOR NEXT