Sushilkumar
Sushilkumar 
क्रीडा

सुशीलची ‘दुखापती’मुळे माघार

सकाळवृत्तसेवा

मुंबई - दोन ऑलिंपिक पदके जिंकणारा मल्ल सुशीलकुमारच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाला दुखापतीचा ब्रेक लागला आहे. आशियाई विजेतेपद स्पर्धा तोंडावर आलेली असताना सुशीलने गुडघा दुखापतीचे कारण देत माघार घेतली. आशिया पात्रता स्पर्धेसाठी त्याने हरविलेल्या आणि त्याच्याबरोबरच वाद झालेला प्रवीण राणाच आता या आशियाई विजेतेपद स्पर्धेत जाणार आहे. ही स्पर्धा कझाकिस्तान येथे २७ फेब्रुवारी ते ४ मार्च या दरम्यान होत आहे.

ऑलिंपिक पदकानंतर सुशीलकुमार आखाड्याच्या बाहेरच अधिक गाजला आहे. रिओ ऑलिंपिकसाठी नरसिंग यादव पात्र ठरल्यानंतर वाद गाजू लागले आहेत. राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत अखेरच्या तीन लढतीत प्रतिस्पर्ध्यांनी घेतलेली माघार आणि यामध्ये समावेश असलेल्या प्रवीण राणाने उभे केलेले आव्हान; तसेच पोलिसांत केलेली तक्रार यामुळे सुशीलकुमार चर्चेत राहिला आहे. 

आगामी राष्ट्रकुल स्पर्धा आणि त्यानंतरची आशियाई स्पर्धा यावर सुशीलने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी राणाविरुद्धची पात्रता लढत त्याने जिंकली होती; परंतु त्या लढतीत सुशीलकुमारच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याची आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याची पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर झालेल्या कुस्ती लीगमध्ये सुशीलने माघार घेतली होती. पात्रता सामन्यातच आपला गुडघा दुखावला होता, त्यातून अजून तंदुरुस्त झालो नसल्याचे सुशीलने सांगितले आहे.

कुस्ती लीग संपल्यानंतर राणाच्या तक्रारीवर चौकशी सुरू होणार होती; तसेच कुस्ती महासंघानेही सुशीलला नोटीस दिलेली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर सुशीलने दुखापतीचे कारण देत माघार घेतली असावी, अशी चर्चा भारतीय कुस्ती वर्तुळात सुरू आहे. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धा नव्या गटानुसार आणि दोन दिवसांची (दुसऱ्या दिवशी पदकांच्या लढती) होणार आहे. या बदलत्या रचनेसाठीही सुशील अजून मानसिकदृष्ट्या तयार नसावा, अशीही चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT