क्रीडा

युकी, साकेत करणार पुनरागमन

सकाळवृत्तसेवा

डेव्हिस करंडकासाठी पेसला वगळण्याचे संकेत

नवी दिल्ली - कॅनडाविरुद्धच्या जागतिक गटातील प्ले-ऑफ डेव्हिस करंडक लढतीसाठी युकी भांब्री आणि साकेत मैनेनी यांचे पुनरागमन निश्‍चित धरले जात असून, अनुभवी लिएँडर पेसला पुन्हा एकदा वगळलेच जाणार, असेच चित्र सध्या दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या लढतीसाठी उद्या (ता. १४) भारतीय टेनिस संघटनेच्या निवड समितीची बैठक होणार आहे. 

यापूर्वी बंगळूर येथे झालेल्या उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी पेसचा सहा खेळाडूंमध्ये समावेश होता; मात्र अंतिम संघ निवडताना कर्णधार महेश भूपतीने त्याला वगळले होते. त्या वेळी पेस आणि भूपती यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले होते.

या वेळी मात्र निवड समिती या सगळ्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून पेसला संभाव्य संघातूनच वगळण्याची शक्‍यता दिसून येत आहे. तसाही पेस रोहन बोपण्णा (२१), दिवीज शरण (५३) आणि पूरव राजा (५४) या दुहेरीतील तीन खेळाडूंपेक्षा क्रमवारीत खूप मागे आहे. हा निकष त्याला वगळताना लावला जाऊ शकतो. 

एकेरीत भांब्री चांगलाच फार्ममध्ये आहे. त्याने जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानावर असणाऱ्या गेल मोंफिसला हरवण्याची कामगिरी करून दाखवली आहे. साकेत दुखापतीमुळे उझबेकिस्तानविरुद्ध खेळू शकला नव्हता. त्यामुळे आता १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या लढतीत एकेरीसाठी या दोघांच्या नावाचा विचार होऊ शकतो. दुहेरीसाठी बोपण्णाच्या जोडीला कोण या प्रश्‍नाचे उत्तर निवड समिती शोधेल. उझबेकिस्तानविरुद्ध खेळलेले प्रज्ञेश गुणेश्‍वरन आणि एन. श्रीराम बालाजी यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश होईल. भारतीय संघाचे सराव शिबिर कोलंबिया विद्यापीठाच्या कोर्टवर होणार आहे. 

पेससाठी दरवाजे बंद झालेले नाहीत. त्याने भारतीय संघात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी जागतिक क्रमवारीत घसरलेले स्थान पुन्हा उंचवावे. आम्ही संघ निवडताना मानांकनाचाच विचार करतो.
- हिरोन्मय चॅटर्जी, भारतीय टेनिस संघटनेचे सचिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: सिलेंडरसाठी वाट पाहणं संपलं! इंडेनचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात; किराणा दुकानातही सहज मिळणार

माईक हिसकावला आणि स्टेजवरुन हकललं, प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पालचा भर कार्यक्रमात अपमान, Viral Video

Central Railway: मध्य रेल्वेवर गोंधळाची परिस्थिती, रुळावर पडून प्रवाशाचा मृत्यू, लोकल सेवा खोळंबली

Latest Marathi News Live Update : - सोलापूरच्या सिंदगीजवळ भीषण अपघात

Ashok Kharat case investigation : अशोक खरातची एसआयटीकडून ५ तास चौकशी, VIP, महिला आणि व्यवहारांसाठी वेगवेगळे मोबाईल नंबर; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT