Dutee Chand Banned 
क्रीडा

Dutee Chand Banned: आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतात मोठा धक्का! धावपटू दुती चंदवर ४ वर्षांची बंदी

Kiran Mahanavar

Dutee Chand banned for 4 years : आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतात मोठा धक्का बसला आहे. भारताची सर्वोत्तम महिला धावपटू दुती चंदही डोपिंगच्या जाळ्यात अडकली आहे. त्यामुळे तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 3 जानेवारी 2023 पासून तिच्यावर बंदी लागू होईल.

दुतीने आशियाई क्रीडा 2018 मध्ये 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये दोन रौप्य पदके जिंकली. नाडाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी दुतीकडून काही सॅम्पल घेतले. दुतीच्या पहिल्या सॅम्पलमध्ये अँडारिन, ऑस्टारिन आणि लिंगंड्रोल आढळून आले आहेत.

दुसरीकडे, दुसऱ्या सॅम्पलमध्ये अँडारिन आणि ऑस्टारिन आढळले. ADDP नुसार, दुतीने घेतलेले पदार्थ वाडाच्या प्रतिबंधित पदार्थांच्या यादीतून तिच्या औषध सामग्रीसाठी तपासले गेले नाहीत.

विशेष म्हणजे दमदार कामगिरीच्या जोरावर दुती चंदने अनेक वेळा तिरंगा फडकवला आहे. 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले. 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये दोन पदके जिंकली. याआधी 2013 मध्ये पुण्यात झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते. 2017 मध्ये भुवनेश्वरमध्येही तिने कांस्यपदक जिंकले आहे. दुतीने दक्षिण आशियाई खेळ 2016 मध्ये रौप्य पदक जिंकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Crime: बनावट क्यूआर कोड अन् फर्म...; बनावट औषधांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश, 'इतका' मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates: एमएमआरडीएची गायमुख-कॅडबरी जंक्शन मेट्रो मार्गिका चाचणीसाठी तयारी सुरू

SCROLL FOR NEXT