क्रीडा

घरची गाय विकून झाला 'गोली', PR श्रीजेशच्या यशाची 'अनटोल्ड स्टोरी'

सुस्मिता वडतिले

श्रीजेशच्या या उकृष्ट कामगिरीमुळे फक्त आम्हालाच नाही, तर देशातील सर्वांनाच आनंद झाला आहे.

Tokyo Olympics 2020: भारतीय मेन्स हॉकी टीमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. यावेळी भारतीय हॉकी संघाचा गोलकिपर आणि भारताचा माजी कर्णधार श्रीजेश.पी.आर याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी केली.

एर्नाकुलम जिल्ह्यातील एरुमेलीमधील पी.व्ही. रवींद्रन या शेतक-याचा श्रीजेश मुलगा आहे. श्रीजेशने केलेल्या या उत्तम कामगिरीमुळे देशभरातून कौतूक होत आहे. याविषयी श्रीजेशचे वडिल रवीद्रंन म्हणाले, भारतीय मेन्स हॉकी टीमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये केलेली कामगिरी पाहून आम्हाला त्याचे खूप कौतुक वाटत आहे. त्यात आमच्या मुलाचा म्हणेजच श्रीजेशचा त्यात खारीचा वाटा आहे. त्यामुळे जास्त आनंद झाला. श्रीजेशच्या या उकृष्ट कामगिरीमुळे फक्त आम्हालाच नाही, तर देशातील सर्वांनाच आनंद झाला आहे. पुढील सामन्यासाठी आमच्याकडून भारतीय संघाला शुभेच्छा देतोय.

पुढे रवीद्रंन म्हणाले, आमच्या मुलाला श्रीजेशला लहानपणापासूनच ॲथलेटिक्समध्ये आवड होती. परंतु आमच्या या गावात हॉकीची सोय नव्हती. त्यामुळे आम्ही त्याला तिरुअनंतपुरम येथील जी.व्ही.राजा स्पोर्टस् स्कूलमध्ये शिक्षणासाठी घातले. श्रीजेश हा आठवीमध्ये असताना हॉकी खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. आम्ही व्यवसायाने शेतकरी असल्याने श्रीजेशला गोलकिपिंगसाठी लागणारे किट घेणे सुध्दा आम्हाला शक्य नव्हते. कारण त्या किटची किंमत 10 हजार रुपये होती. या किटसाठी कसेतरी पैसे जमविले त्यामध्ये आम्ही आमची दुभती गाय विकून श्रीजेशसाठी गोलकिपिंगचे किट विकत घेतले. श्रीजेशने त्याच्या खेळावर खूप मेहनत घेतली आणि आज आम्हाला इथे आणले आहे. श्रीजेश माझा मुलगा असल्याचा मला खूप अभिमान वाटत आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यावेळी श्रीजेशची पत्नी अनिशा हिने भारतीय संघ कांस्य पदकासह मायदेशी परतेल, असा विश्वास व्यक्त केला होता. यावेळी तिने श्रीजेशची खासियतही सांगितली होती. सामना कोणताही असला तरी तो गांभिर्यानेच खेळतो. त्याने स्वत:ला हॉकीसाठी झोकून दिलय, असे ती म्हणाली होती. श्रीजेश आणि अनिशा यांच्यातील नाते केवळ पती पत्नीचे नाही. ते एकमेकांचे वर्गमित्रही होते. तिने व्यक्त केलेला विश्वास श्रीजेशनं जर्मनीविरुद्धच्या सामन्यात साध्य करुन दाखवलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT