India vs Sri Lanka
India vs Sri Lanka E Sakal
क्रीडा

टीम इंडियाला दुय्यम म्हणणाऱ्या माजी कर्णधाराला बोर्डानं दिलं उत्तर

सुशांत जाधव

शिखर धवनचे नेतृत्व आणि द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी-20 मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या माजी कर्णधाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. श्रीलंकेला विश्व चॅम्पिय करणाऱ्या अर्जुन रणतुंगाने धनवच्या नेतृत्वाखालील संघाला दुय्यम संघाची उपमा दिलीये. त्यांच्यासोबत खेळणं हा श्रीलंकन क्रिकेट संघाचा अपमान असल्याचे मतही त्याने व्यक्त केले. टेलिव्हिजन मार्केटिंगची गरज म्हणून या दौऱ्याचे नियोजन करण्यात आल्याचा आरोपही त्याने बोर्डावर केलाय. त्यामुळे भारत-श्रीलंका यांच्यातील मालिकेपूर्वी श्रीलंकन बोर्ड आणि माजी विश्व चॅम्पियन कर्णधार यांच्यात आपापसात सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. (Sri Lanka Cricket reacts on Arjuna Ranatungas second string Indian side)

अर्जुन रणतुंगाच्या वक्तव्यानंतर श्रीलंकन बोर्डाने त्याला प्रत्युत्र दिले आहे. श्रीलंका दौऱ्यावर आलेला भारतीय संघ अनुभवी आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली 20 जणांच्या ताफ्यातील 14 सदस्य कोणत्या ना कोणत्या प्रकारात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे हा संघ दुय्यम दर्जाचा नाही, असा टोला त्यांनी रणतुंगाला लगावलाय. आयसीसीने पूर्णकालीन सदस्य असणाऱ्या संघांना वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळा संघ निवडण्याची मुभा दिल्याचा उल्लेख बोर्डाने केलाय. भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंका विरुद्धच्या सामन्यापूर्वी क्वांरटाईनचा कालावधी पूर्ण केला असून ते आगामी मालिकेसाठी उत्सुक आहेत. 13 जुलैपासून वनडे मालिकेनं भारतीय संघ या दौऱ्याला सुरुवात करेल.

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली संघात भुवनेश्वर कुमारकडे उप कर्णधारपद देण्यात आले आहे. पृथ्वी शॉ, ईशान किशन, ऋतूराज गायकवाड या सारख्या युवांचा भरणा असलेला संघ श्रीलंकेचा सहज धुव्वा उडवू शकतो. श्रीलंकेला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या रणतुंगा यांना हा टीम दुय्यम वाटते हे आश्चर्यच आहे. याच दुसरं कारण सध्याच्या घडीला इंग्लंड दौऱ्यावर श्रीलंकेची जी अवस्था आहे ती खूपच बिकट आहे. त्यांना अपमानास्पद पराभवाला सामोरे जावे लागत आहे. भारतीय संघाने घरच्या मैदानावर त्यांची अवस्था अशीच केली तर रणतुंगा तोंडावर आपटतील, हेही तितकेच खरे. भारतीय संघ आता त्याच इराद्याने मैदानात उतरेल.

इंग्लंड दौऱ्यावर श्रीलंकेने आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दौऱ्यावर श्रीलंकेच्या नावे क्रिकेटच्या मैदानात सर्वाधिक सामन्यात पराभूत होण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेलाय. श्रीलंकेन 860 वनडेतील 428 सामने गमावले आहेत. हा रेकॉर्ड पूर्वी भारतीय संघाच्या नावे होता. टीम इंडियाने 427 वनडे सामने गमावले आहेत. आता श्रीलंकाही सर्वाधिक पराभूत होणारा टीम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT