Sri Lanka Cricketer Danushka Gunatilleke Arrested In Sydney T20 World Cup  esakal
क्रीडा

Danushka Gunathilaka: श्रीलंकेच्या फलंदाजाला ऑस्ट्रेलियात केले अटक, बलात्काराचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

श्रीलंका क्रिकेट दनुष्का गुनाथिलका याला बलात्काराच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे अटक करण्यात आली आहे. रविवारी सकाळी श्रीलंकेचा संघ त्याच्याशिवाय आपल्या देशाला रवाना झाला. (Sri Lanka Cricketer Danushka Gunatilleke Arrested In Sydney T20 World Cup )

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या तक्रारीवरून दनुष्का गुनाथिलकाला अटक करण्यात आली आहे. 31 वर्षीय क्रिकेट स्टारला रविवारी पहाटे 1 वाजता सिडनीच्या पूर्वेकडील ससेक्स स्ट्रीट येथील हॉटेलमध्ये गेल्या आठवड्यात एका कथित घटनेच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. 29 वर्षीय महिलेने आरोप केला आहे की, गुणथिलकाने घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अशी माहिती पोलिसांनी दिली.

ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, पोलिसांनी आरोप केला आहे की या महिलेने ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे अनेक दिवस दनुष्का गुनाथिलकाशी चॅट केले होते. बुधवारी दोघांची भेट झाली होती. त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT