Sri Lanka out of WTC final race Team India face Australia 7 to 11 June at the Oval England 
क्रीडा

WTC Final 2023: WTC फायनल शर्यतीतून श्रीलंका बाहेर! इंग्लंडमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाशी होणार सामना

Kiran Mahanavar

Sri Lanka out of WTC Final Race : हजारो मैल दूर असलेल्या न्यूझीलंडच्या विजयाने भारताचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील तिकीट निश्चित झाले आहे.

न्यूझीलंडने अखेरच्या षटकात श्रीलंकेचा दमदार थ्रिलरमध्ये पराभव केला. भारत आणि WTC फायनलच्या तिकीटात श्रीलंका हा एकमेव अडथळा होता. श्रीलंकेने हा सामना जिंकला असता तर ते WTC फायनलच्या शर्यतीत राहिले असते.

मात्र शेवटच्या षटकापर्यंत झुंज देऊनही त्यांना क्राइस्टचर्च कसोटीत न्यूझीलंडला हरवता आले नाही. श्रीलंकेचा पराभव झाल्याने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतुन बाहेर गेला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे, हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 ते 11 जून या कालावधीत होणार आहे.

यजमान न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात क्राइस्टचर्च येथे दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला गेला. हा सामना कसोटी इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक होता, ज्यामध्ये न्यूझीलंडने शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेचा पराभव केला.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक ते शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्या संघाचे नेतृत्व केले. न्यूझीलंडला विजयासाठी 70 षटकांत 285 धावांचे कठीण लक्ष्य मिळाले असताना त्याने शानदार शतक झळकावले. कर्णधार केन विल्यमसनने चौथ्या डावात 121 धावांची नाबाद खेळी केली.

9 ते 13 मार्च दरम्यान जगाच्या दोन टोकांना दोन कसोटी सामने खेळले गेले. हे दोन्ही सामने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतासमोर होता आणि श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडसमोर होता.

WTC फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेला हा सामना जिंकणे आवश्यक होते. पण श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडकडून हरला. यासह डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या शर्यतीत श्रीलंका बाहेर गेला.

श्रीलंकेकडून विजय मिळवण्यासाठी न्यूझीलंडला शेवटच्या 10 षटकात 58 धावा करायच्या होत्या आणि त्यांच्या 5 विकेट शिल्लक होत्या. पण दोन षटके बाकी असताना त्यांची धावसंख्या 6 गडी बाद 270 अशी होती.

खेळात एक षटक बाकी असताना न्यूझीलंड विजयापासून 7 धावा दूर होता आणि 3 विकेट्स शिल्लक होत्या. या भिन्न समीकरणांमध्ये एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे क्रीजवर उभा असलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत न्यूझीलंडने सामना 2 विकेटने जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा की चोरांची चंगळ? मोबाईल अन् सोन्याचे दागिने गायब, लुटमारीचा आकडा वाचून व्हाल थक्क

Latest Marathi News Updates : 'सगेसोयरे' जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी धुळ्यात ओबीसी संघटना आक्रमक

Bullet Train: बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा नवा टप्पा सुरू! ४० मीटर लांबीचा पहिला बॉक्स गर्डर लॉन्च

Satara Accident:'संगममाहुलीतील अपघातात भोसेतील माजी सैनिक ठार'; दुचाकी अन् ट्रकची भीषण धडक

Nashik Ganesh Visarjan : डीजे बंदी झुगारून गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट; नाशिकमध्ये शांततेत पार पडला सोहळा

SCROLL FOR NEXT