World Cup Qualifiers 2023 sakal
क्रीडा

World Cup Qualifiers 2023: वर्ल्ड कपसाठी श्रीलंका पात्र, 12 वर्षांनंतर वानखेडेवर भारताशी भिडणार

श्रीलंकन संघ विश्वकरंडकासाठी पात्र! सुपर सिक्स फेरीत झिम्बाब्वेवर ९ विकेट राखून मात

Kiran Mahanavar

Sri Lanka qualifies for ODI World Cup : वेस्ट इंडिजचा संघ विश्वकरंडकाच्या मुख्य फेरीतून बाद झाल्यानंतर श्रीलंकन संघाने रविवारी झिम्बाब्वेवर 9 विकेट राखून मात केली. या विजयासह श्रीलंकेने पात्रता फेरीतील सुपर सिक्समध्ये 8 गुणांची कमाई केली आणि मुख्य फेरीत प्रवेश केला.

भारत विरुद्ध श्रीलंका सामना 2 नोव्हेंबरला होणार

श्रीलंकेचा संघ 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरला असून आता 2 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर भारताचा सामना होणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात वानखेडे स्टेडियमवर 12 वर्षांनंतर आता भारतीय भूमीवर सामना होणार आहे.

यापूर्वी, भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात सामना झाला होता, ज्यामध्ये भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा पराभव करून दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

आता भारतात होणाऱ्या विश्वकरंडकातील नऊ देश निश्चित झाले असून एका स्थानासाठी चुरस आहे. झिम्बाब्वे, स्कॉटलंड व नेदरलँड यांच्यामध्ये या स्थानासाठी चुरस आहे. झिम्बाब्वेकडून श्रीलंकेसमोर १६६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.

पाथुम निस्सांका व दिमुथ करुणारत्ने या सलामी जोडीने १०३ धावांची भागीदारी करीत दमदार सुरुवात केली. रिचर्ड नगारावा याने करुणारत्ने याला ३० धावांवर बाद केले, पण त्यानंतर पाथुम व कुशल मेंडिस यांनी श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाथुम याने १४ चौकारांसह नाबाद १०१ धावांची शानदार खेळी साकारली.

तीक्षणा, मदुशंकाची प्रभावी गोलंदाजी

याआधी सीन विल्यम्स याने ५७ चेंडूंमध्ये ५६ धावांची खेळी केली, पण झिम्बाब्वेच्या इतर फलंदाजांना ठसा उमटवता आला नाही. माहीश तीक्षणा व दिलशान मदुशंका यांनी प्रभावी गोलंदाजी करीत झिम्बाब्वेला १६५ धावांवरच रोखले. मदुशंका याने १५ धावा देत तीन फलंदाज बाद केले. तीक्षणा याने २५ धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

संक्षिप्त धावफलक : झिम्बाब्वे सर्व बाद १६५ धावा (सीन विल्यम्स ५६, माहीश तीक्षणा ४ / २५) पराभूत वि. श्रीलंका ३३.१ षटकांत १ बाद १६९ धावा (पाथुम निस्सांका नाबाद १०१).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT