Asia Cup 2022 sakal
क्रीडा

श्रीलंकेने टी-20 Asia Cupचे यजमानपद नाकारलं, भारतात होणार सामने?

आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे टी-20 आशिया चषक आयोजित करण्याच्या स्थितीत नाही

Kiran Mahanavar

Asia Cup 2022: श्रीलंका या वर्षी होणार्‍या आशिया कपचे यजमानपद भूषवत होती, परंतु आर्थिक संकटामुळे ते स्पर्धेचे आयोजन करू शकणार नाही. श्रीलंका क्रिकेटने बुधवारी आशियाई क्रिकेट परिषदेला ही माहिती दिली. आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे टी-20 आशिया चषक आयोजित करण्याच्या स्थितीत नाही, असे सांगण्यात आले. अशा स्थितीत आशिया चषक यूएई किंवा भारतामध्ये खेळल्या जाऊ शकते. (sri lanka refuses to host t20 asia cup)

आशिया चषक यावर्षी श्रीलंकेत होणार होते, परंतु देशात आर्थिक संकट अजूनही आहे. 60 लाखांहून अधिक लोकांसमोर अन्नधान्याचे संकट उभे राहिले आहे. औषध, स्वयंपाकाचा गॅस, इंधन आणि टॉयलेट पेपर यासारख्या अत्यावश्यक वस्तूंचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे, ज्यामुळे श्रीलंकन ​​लोकांना इंधन आणि स्वयंपाकाचा गॅस घेण्यासाठी तासनतास दुकानाबाहेर रांगेत थांबावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनाही पेट्रोल आणि डिझेलसाठी दोन दिवस रांगेत उभे राहावे लागते.

आशिया चषक 2018 पासून कोणत्या ना कोणत्या कारणाने पुढे ढकलण्यात आले आहे, आणि गेल्या 3 वर्षांपासून कोरोनामुळे होऊ शकला नाही. अशा स्थितीत आशियाई क्रिकेट परिषदेला या वेळी ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत आयोजित करायची आहे. श्रीलंकेने यजमानपद नाकारल्यामुळे ही स्पर्धा ही स्पर्धा यावर्षी भारतामध्ये किंवा यूएईमध्ये खेळवली जाऊ शकते. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांसारखे मोठे संघ 26 ऑगस्टपासून होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT