Sri Lanka Seal Thrilling Super Over Victory Against New Zealand to Win T20I Series Opener cricket-news-in-marathi-  
क्रीडा

NZ vs SL 1st T20I : रोमहर्षक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये लंकेने न्यूझीलंडचा केला पराभव

Kiran Mahanavar

Sri Lanka vs New Zealand 1st T20I : न्यूझीलंड दौऱ्यावर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने रोमहर्षक विजय मिळवला. ऑकलंडमध्ये आज खेळल्या गेलेल्या या टी-20 सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 196 धावांची मोठी धावसंख्या उभारली, प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून सामना बरोबर केली. मात्र येथे किवी संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका (0) सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र, त्यानंतर कुसल मेंडिस (25), कुसल परेरा (53), धनंजया डी सिल्वा (15), चरिथ अस्लंका (67) आणि वानिंदू हसरंगा (21) यांनी दमदार फलंदाजी केल्याने श्रीलंकेने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावले आणि 196 धावांपर्यंत मजल मारली.

197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या किवी संघाची सुरुवातही खराब झाली. न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर एकूण तीन धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र इथून टॉम लॅथम (27), डॅरिल मिशेल (66), मार्क चॅपमन (33), जिमी नीशम (19), रचिन रवींद्र (26) आणि ईश सोधी (10) यांनी सामना बरोबरीत सोडवला.

सामन्याच्या शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 13 धावांची गरज होती. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका स्वतः गोलंदाजी करत होता. त्याने पहिल्या 5 चेंडूत फक्त 6 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. आता सामना टाय करण्यासाठी न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज होती आणि इथे ईश सोधीने षटकार ठोकला.

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली. येथे महिष तेक्षानाने पहिल्या चार चेंडूत केवळ 4 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. त्याने पाचव्या चेंडूवर चौकार आणि सहाव्या चेंडूवर आणखी एक विकेट घेतली. अशा प्रकारे सुपर ओव्हरमध्ये किवी संघाला केवळ 8 धावाच करता आल्या.

श्रीलंकेने 9 धावांचे हे लक्ष्य तीन चेंडूतच गाठले. अॅडम मिल्नेच्या पहिल्या चेंडूवर मेंडिसने एक धाव घेतली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चरिथ अस्लंकाने षटकार मारला आणि तिसऱ्या चेंडूवर, जो नो-बॉलही होता. अस्लंकाने चौकार मारून सामना आपल्या नावावर केला. अस्लंकाची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणूनही निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT