IND vs SL IPL 2023 Dasun Shanaka  esakal
क्रीडा

IND vs SL IPL 2023 : गुजरात टायटन्सचे श्रीलंकेच्या कर्णधारावर लक्ष; संधी मिळताच उचलणार

अनिरुद्ध संकपाळ

IND vs SL IPL 2023 Dasun Shanaka : श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाने गेल्या काही महिन्यांपासून भारताविरूद्ध विशेष कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वातील श्रीलंकेच्या संघाने भारताला कडवी टक्कर दिली आहे. लंकेने आशिया कपवर देखील आपले नाव कोरले. मात्र आयपीएल लिलावात दसुन शानकाला कोणत्याही संघाने करारबद्ध केलेले नाही.

मात्र सध्या सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका याच्यातील टी 20 मालिकेत शानकाने दमदार कामगिरी करत मालिका बरोबरीत आणली आहे. त्यामुळे आयपीएलमधील फ्रेंचायजी शानकाला आपल्या गोटात खेचण्याच्या तयारीत आहे.

लिलाव पार पडल्यामुळे सध्या तरी दोनच संघ दसुन शानकाला आपल्या गोटात खेचू शकतात असे दिसतंय. दोन संघांकडे 7 विदेशी खेळाडू आहेत. जर या दोन संघांमधील एखादा भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर ते रिप्लेसमेंट म्हणून शानकाला आपल्या संघात घेऊ शकतात.

1 पंजाब किंग्ज

पंजाब किंग्जकडे लिलावात बराच पैसा शिल्लक राहिला. मात्र तरी देखील त्यांना आपल्या आठ विदेशी खेळाडूंचा कोटा पूर्ण करता आला नाही. ते एक अष्टपैलू जो वेगवान गोलंदाजी करू शकतो अशा खेळाडूला आपल्या संघात स्थान देऊ शकतात. त्याच्यासाठी दसुन शानका हा एक चांगला पर्याय आहे.

जर पंजाब संघातील एखादा भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त झाला तरी पंजाब किंग्ज श्रीलंकेच्या या कर्णधाराला आपल्या संघात स्थान देऊ शकते. यामुळे पंजाबच्या खालच्या फळीत एक अनुभवी खेळाडू वाढू शकतो. त्यांच्याकडे सध्या शाहरूख खान जितेश शर्मा आहेत त्यात दसुन शानकाची भर पडू शकते.

2 गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सकडेही फक्त 7 विदेशी खेळाडू आहेत. ते देखील शानकासाठी आग्रही राहू शकतात. त्यासाठी एखादा भारतीय खेळाडून दुखापतग्रस्त होणे गरजेचे आहे. गतविजेत्यांनी आपल्या विदेशी खेळाडूंचा कोटा पूर्ण केलेला नाही. त्यामुळे ते अजूनही शानकाला करारबद्ध करू शकतात.

शानका हा डेव्हिड मिलर आणि हार्दिक पांड्याचा बॅकअप ठरू शकतो. गुजरात टायटन्स अजून एका विदेखी वेगवान गोलंदाजाला आपल्या संघात स्थान देऊ शकते. त्यामुळे त्याच्यासाठी शानका हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT