Sri Lanka vs Australia second Test Locals defy ban protesters on Galle fort Sanath Jayasuriya  
क्रीडा

श्रीलंकन आंदोलन पोहचलं ऑस्ट्रेलियन मॅचपर्यंत, जयसूर्यासुद्धा उतरला रस्त्यावर

श्रीलंकेतील परिस्थिती सातत्याने बिघडत असून आता आंदोलक गाले येथे ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा कसोटी सामना स्टेडियमबाहेर पोहोचले आहेत

Kiran Mahanavar

Sri Lanka vs Australia: श्रीलंकेतील परिस्थिती सातत्याने बिघडत असून आता आंदोलक राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत. गोटाबाया राजपक्षे हे त्यांच्या सरकारी निवासस्थानातून पळून गेले आहेत. राजपक्षे यांच्यावर मार्च महिन्यापासून राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे. शनिवारी परिस्थिती आणखी बिघडली तर त्याचा परिणाम कोलंबोसह इतर शहरांमध्ये दिसून आला. गाले येथे सध्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा कसोटी सामना सुरू असून आंदोलक आता स्टेडियमबाहेर पोहोचले आहेत.(sri lanka protesters galle test match australia vs sri lanka fort)

शनिवारी मोठ्या संख्येने आंदोलक गॅलेमध्ये दाखल झाले. स्टेडियमच्या बाहेर आणि आत पोस्टर फडकावले. गॅले येथील स्टेडियमजवळील किल्ल्यावर खेळादरम्यान जाण्यास मनाई आहे. मात्र यावेळी आंदोलक येथे पोहोचले आणि त्यांनी येथूनच त्यांचे पोस्टर फडकावले. हजारो आंदोलकांनी स्टेडियमबाहेरही घोषणाबाजी केली. मात्र याचा परिणाम सामन्यावर झाला नाही आणि दोन्ही संघांमधील सामना असाच सुरू राहिला.

श्रीलंकेतील विविध शहरांमध्ये आंदोलकांची गर्दी जमत असून आता अनेक सेलिब्रिटी त्यात सामील होऊ लागले आहेत. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यानेही रस्त्यावर उतरला आहे. कोलंबोतील राष्ट्रपती भवनाजवळ सनथ जयसूर्याही पोहोचले असून तेथे आंदोलकांची गर्दी आहे.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना गाले येथे सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने येथे पहिल्या डावात 364 धावा केल्या, ज्यात स्टीव्ह स्मिथने केलेल्या शानदार 145 आणि मार्नस लॅबुशेनच्या 104 धावांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT