Sri Lanka vs Bangladesh Test Series esakal
क्रीडा

बांगलादेशविरुद्ध श्रीलंका संघाची घोषणा, करुणारत्नेकडं पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

सकाळ डिजिटल टीम

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीनं हा दौरा श्रीलंकेसाठी खूप महत्त्वाचा आहे.

Sri Lanka vs Bangladesh Test Series : श्रीलंका क्रिकेट मंडळानं (Sri Lanka Cricket Board) बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 18 खेळाडूंची घोषणा केलीय. सलामीवीर दिमुथ करुणारत्नेकडे (Dimuth Karunaratne) पुन्हा एकदा संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. मात्र, काही महत्त्वाच्या खेळाडूंना या संघात स्थान मिळालेलं नाहीय. श्रीलंकेचा फलंदाज रोशन सिल्वा बांगलादेश दौऱ्यातून बाहेर पडलाय. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 15 मे पासून चितगाव इथं, तर दुसरा सामना 23 मे पासून ढाका इथं खेळवला जाणार आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) दृष्टीनं हा दौरा श्रीलंकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. सध्या संघ पाचव्या क्रमांकावर आहे. 2021-23 दरम्यान संघानं दोन सामने जिंकले आहेत आणि दोन सामन्यांमध्ये बरोबरीवर समाधान मानावं लागलंय. यादरम्यान बांगलादेशनं केवळ एक कसोटी सामना जिंकलाय. सध्या हा संघ यादीत 8 व्या क्रमांकावर आहे.

अनकॅप्ड खेळाडूंना संघात स्थान

आपल्या युवा खेळाडूंवर विश्वास व्यक्त करत श्रीलंका क्रिकेट बोर्डानं या दौऱ्यासाठी संघात तीन अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश केलाय. कामिल मिशहारा, दिलशान मदुशंका आणि सुमिंदा लक्षण यांना या यादीत स्थान मिळालंय.

'या' खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

या दौऱ्यात अनेक वरिष्ठ खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाहीय. लाहिरू थिरिमाने, चरित अस्लंका, लाहिरू कुमारा, दुष्मंथा चमीरा आणि जेफ्री वेंडरसे यांना वगळण्यात आलंय. दुष्मंथा चमीरा सध्या आयपीएल खेळत असून लखनऊ सुपरजायंट्सच्या नवीन संघाचा तो भाग आहे.

श्रीलंकेचा 18 जणांचा संघ

दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), कामिल मिशहारा, ओशादा फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस, धनंजय डी सिल्वा, कामिंदू मेंडिस, निरोशन डिकवेला, दिनेश चंडीमल, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, सुमिंदा लक्षण, कसुन रजिथा, विश्वा फर्नांडो, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका, प्रवीण जयविक्रमा आणि लसिथ एम्बुल्डेनिया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: कोकाटेंचं मंत्रिपद बीडच्या नेत्याला मिळणार? धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का देण्याची तयारी

IND vs SA, 4th T20I: धुक्यामुळे सामना रद्द! मग फॅन्सला तिकीटांचे पैसे परत मिळणार की नाही? BCCI चा नियम काय?

Sexual Assault Case : धक्कादायक! उसात नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमांनी तिचे कपडे पळवून नेले अन् भेदरलेल्या अवस्थेत मुलीने...

Dolly Chaiwala Viral Video : डॉली चायवाल्याचा रॉयल स्वॅग ! टपरीवर चहा विकायला डिफेंडरमधून आला, लोक म्हणाले- डिग्र्या फाडून फेकून देऊ का?

Latest Marathi News Live Update : पुण्यात 25 ई डबल डेकर बस

SCROLL FOR NEXT