Team India File Photo
क्रीडा

SL vs IND : द्रविड म्हणाला, Playing 11 बेस्टच!

शिखर धवनच टॉससाठी मैदानात आल्याचेही पाहायला मिळाले

सुशांत जाधव

Sri Lanka vs India 2nd T20I : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे टीम निवडीचा मोठा पेच टीम मॅनेजमेंट आणि द्रविड यांच्यासमोर आहे. क्रुणाल पांड्याच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंनाही क्वारंटाईन करण्यात आले असून उपलब्ध संघातून संघ निवडण्याची वेळ टीम इंडियावर आली आहे. श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने सामन्यापूर्वी टीम इलेव्हनवर भाष्य केले. (Sri Lanka vs India 2nd T20I Rescheduled match Rahul Dravid On Playing 11 Padikkal Gaikwad Rana and Sakariya debutants)

क्रुणाल पांड्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करावे लागल्याने प्लेइंग इलेव्हनसाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूमधून संघ निवडावा लागेल. प्रत्येक खेळाडू हा प्रतिभावंत असल्यामुळेच त्याची या दौऱ्यासाठी निवड झाली आहे. टीमच्या संतुलनाबाबत थोडी समस्या नक्की आहे. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडलेले सर्वच बेस्ट आहेत, असे राहुल द्रविड यांनी मॅचपूर्वी सांगितले. नवोदित या सामन्यात कशी कामगिरी करुन दाखवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असेही द्रविडने म्हटले आहे. श्रीलंकेचा कर्णधार शनाकाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय संघ पहिल्यांदा बॅटिंग करताना त्यांना किती धावांचे टार्गेट ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

India (Playing XI): शिखर धवन (कर्णधार), ऋतूराज गायकवाड, देवदत्त पदिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चाहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया, वरुण चक्रवर्ती.

श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शिखर धवन खेळण्यासंदर्भात अनेक तर्क वितर्क लढवण्यात आले होते. पण नाणेफेकीसाठी धवनच मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. देवदत्त पडिक्कल खेळण्याबाबत संभ्रम होता. तोही नाणेफेकीनंतर दूर झाला. त्याच्यासह मराठमोळा ऋतूराज गायकवाड, नितीशा राणा आणि चेतन सकारिया हे चार खेळाडू आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पदार्पण करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur President’s Rule Ends: वर्षभरानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात ; युमनाम खेमचंद सिंह घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ!

U19 World Cup: भारताविरुद्ध सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या दोघांची शतकं, विक्रमही नावावर अन् संघाच्या ३०० धावाही पार...

Horoscope : 150 वर्षानंतर उद्या बनतोय खास योग! 'या' 5 राशी ठरणार लकी; धनलाभ, कामातली अडचण होईल दूर, वैवाहिक जीवनाला नवे वळण

Rise of Online Education : भारतातील ऑनलाईन शिक्षणाचा उदय : एमबीए आणि काम करणाऱ्या  व्यवसायिकांसाठीचा नेमका अर्थ 

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपावर भाजपचे वर्चस्व! हिमगौरी आहेर-आडके यांचा अर्ज दाखल, पण 'ठाकरे' गटाच्या एन्ट्रीने लढत होणार

SCROLL FOR NEXT