Wanindu Hasaranga  esakal
क्रीडा

Wanindu Hasaranga : लंकेला मोठा धक्का! हसरंगाने अचानक घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, धक्कादायक कारण आले समोर

Kiran Mahanavar

Wanindu Hasaranga announces retirement from Test cricket : श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने स्वतः श्रीलंका क्रिकेट बोर्डाला याची माहिती दिली आहे. हसरंगाने आपल्या निर्णयामागे महत्त्वाचे कारणही दिले आहे.

पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये जास्त वेळ खेळण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे त्याने म्हटले आहे. हसरंगा आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करतो.

वानिंदू हसरंगाने कसोटी क्रिकेटला केला अलविदा

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला माहिती दिली आणि बोर्डानेही त्यांचा निर्णय मान्य केला.

हसरंगाच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल श्रीलंका क्रिकेटचे सीईओ ऍशले डी सिल्वा म्हणाले, "आम्ही त्याचा निर्णय स्वीकारू आणि आम्हाला विश्वास आहे की हसरंगा आमच्या पांढर्‍या चेंडूच्या क्रिकेट संघाचा महत्त्वाचा भाग असेल."

निवृत्त होण्यापूर्वी हसरंगाने श्रीलंकेसाठी चार कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने एकूण 196 धावा केल्या आहेत आणि चार विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्येही त्याचे अर्धशतक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT